मुख्य सामग्रीवर वगळा

विनाशवेळा - हेन्री मिलर (महेश एलकुंचवार)

विनाशवेळा - हेन्री मिलर 
(महेश एलकुंचवार)(211125)


रॅम्बो हा फ्रेंच कवी वयाच्या 18 व्या वर्षी कविता लिहिण्याचे बंद करतो, 36 व्या वर्षी कॅन्सरने वारतो. हेन्री मिलर ने त्याच्या जीवनाशी रॅम्बो ची तुलना केली आहे. 73 पानांचं हे पुस्तक वाचताना जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन 180 अंश कोनात बदलू शकतो. पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी हे पुस्तक संग्रही असावं.

खोलीतील पंख्याकडं किंवा खिडकीतून आकाशाकडं किंवा भिंतीकडं किंवा शून्यात टक लावून पाहत बसण्याची सवड तुम्हाला असेल.

तुमच्या भौतिक गरजा भागल्यात, तुम्हाला आर्थिक विवंचना नाही, तुमच्याकडे विचार करण्यासाठी वेळ आहे आणि तुम्ही फुटकळ मनोरंजनाचा मोह टाळून विचार करता तेव्हा तुमच्या लक्षात येईल किंवा जाणवेल किंवा प्रश्न पडेल ही सर्व यातायात कशासाठी?

चिंतन, मनन, आत्मपरीक्षण साठी असा वेळ भेटणं तो त्यासाठीच लावणं हे माणूसपणाचं लक्षणं आहे, उपाय ठाऊक नसणाऱ्या दुःखाचंही हेच कारण आहे. पण हे दुःख किंवा अस्वस्थता आपलं मानवी जीवनाच आकलन सकस करते.

टिप्पण्या