मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्षवेध - रणजित देसाई ( मेहता पब्लिशिंग हाऊस )

लक्षवेध ही कादंबरी रणजीत देसाई यांनी लिहिली आहे. अफजलखानाचा वध हा विषय आहे. कादंबरी लिहिताना नाट्यमय काल्पनिक संवाद लिहून रंगत आणण्याचा प्रयत्न होणारच, पण इतिहासाची मोडतोड होऊ नये. ही रास्त अपेक्षा आहे, नाही का? रणजीत देसाई यांनी लेखणीच्या, प्रतिभेच्या जोरावर इतिहासाचा (सत्याचा) मूडदाच पाडला आहे. स्वराज्यला फितूर झालेले इतर मराठा सरदार यांची नावं पूर्ण दिलीत.  उदा. 1)खंडोजी खोपडे _ अफझल चा पोरगा फाझल खान ला पळून जाण्यासाठी मदत करणारा. 2) मंबाजीराजे भोसले (शिवरायांचे चुलत चुलते ) अफझल खान च्या वतीने चालून आले. 3) प्रतापराव मोरे (जावळीचे वतन मिळण्याची आशा ) पण स्वजातीचा असणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी याच्या आडनाव चा उल्लेख एकाही ठिकाणी केलेला नाही.  एकवेळ इतपर्यंत ठीक..... पण कृष्णा भास्कर कुलकर्णी हा अफझलखान चा वकील म्हणून आला आणि शिवरायांशी बोलल्यानंतर तो double agent बनून शिवरायांना मदत करू लागला असं फार खुबीने सुचवलं आहे. यालाच म्हणतात कलमकसाई..... प्रत्यक्षात छत्रपती शिवरायांवर त्यांच्या हयातीत एकमेव वार झाला आहे, तो या कृष्णा भास्कर कुलकर्णी याने अफजलखानाच्या व...
अलीकडील पोस्ट

लीडर - कॉ. उमेश सूर्यवंशी (प्रयास पब्लिकेशन)

"ज्यांना इतिहास समजणार नाही, त्यांना वर्तमान समजणार नाही, ज्यांना वर्तमान समजणार नाही, त्यांना भविष्य घडवता येणार नाही" __कॉ. गोविंद पानसरे कॉम्रेड गोविंद पानसरे सर यांच्या कार्याची धावती ओळख करून देणार लीडर हे पुस्तक नुकतच वाचलं. पानसरे सर यांचे नाव माहीत होतं. ब्राह्मण्यवादी सनातनी विचारसरणीने कॉम्रेड गोविंद पानसरे सर यांची हत्या घडवून आणलेली .त्या बातमीने मला वाईट वाटलं होतं. त्यांच्या हत्येनं आपण नेमकं काय गमावलं याची जाणीव लीडर पुस्तकातून झाली. आर्थिक, शारीरिक, मानसिक झळा सोसून खस्ता खाऊन कार्यकर्ते देह झिजवतात, वेळ खर्ची करतात. समाजाचं भलं व्हावं, शोषणापासून मुक्ती व्हावी यासाठी त्याग करण्याची ही प्रेरणा कुठून येते ? बदल घडताना दिसत नाहीये, राजकीय यश मिळत नाहीये, तरी कार्यकर्ते थांबत कसे नाहीत? निराश, हताश कसे होत नाहीत? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लीडर मध्ये मिळतील. ज्याच्याकडे विद्याबळ, अधिकारबळ, द्रव्यबळ नाही तो बहुजन हा विचार प्रमाण मानून कॉम्रेड गोविंद पानसरे सर 63 वर्षे सामाजिक जीवनात कार्यरत राहिले. कामगारांच्या हिताची ...

पावनखिंड - रणजित देसाई ( मेहता पब्लिशिंग हाऊस )

छत्रपती शिवरायांनी रयतेच राज्य, स्वराज्य उभं केलं. ते करताना कित्येक मावळ्यांनी सर्वोच्च त्याग केला, प्राणुहिती दिली. काही नाव इतिहासात नोंदवली गेली काही अनामिक राहिली. पावनखिंडीतील थरार वाचताना या सर्वांच्या त्यागाची जाणीव होते, शेवटी डोळे पाणवतात. घोडखिंड पावनखिंड कशी झाली?  कृष्णाजी बांदल हे आदिलशाहीच्या बाजूनं देशमुखी सांभाळत होते. बांदल यांच्याकडे बाजीप्रभू देशपांडे प्रधान / दिवाण म्हणून होते. त्यांची हिरडस मावळा या प्रांतात सत्ता होती. शिवाजी राजांनी त्यांना स्वराज्यात सामील होण्याचं आवाहन केल होत. सलूख (समझोता ) होऊ शकला नाही. लढाई झाली त्यात कृष्णाजी बांदल यांना विरमरण आलं. त्यांचा रोहिडा किल्ला स्वराज्यात आला. शिवरायांनी बांदल व बाजीप्रभू यांचे वतन तसेच त्यांच्याकडे ठेवले. झालं गेलं विसरून त्यांची मनं जिंकण्याला प्राधान्य दिल आणि स्वराज्याशी एकनिष्ठ राहण्यास भाग पाडलं. बाजीप्रभू शिवरायांचे खास शिलेदार झाले. अफझल खान स्वराज्यवार चालून आला. महाराजांनी त्याचा निक्काल लावला.  (10 नोव्हेंबर 1659) त्यानंतर आदिलशाहीतील किल्ले जिंकून घेण्याचा सपाटा लावला. या प्रत्...

छत्रपती संभाजी एक चिकिस्या - डॉ जयसिंगराव पवार (मेहता पब्लिशिंग हाऊस )

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव निघालं की आपसूक तोंडातून जय निघत. महाराष्ट्रातील प्रत्येक मन बालपणापासून यांच्या पराक्रमाने भारावून गेलेलं असतं. मनामध्ये महाराजांविषयी नितांत आदर आहे पण त्यांचा जीवनपट, संघर्ष, साहस आणि वेगळेपण कशात आहे याचा अभ्यास मराठी माणसांकडून होत नाही असं जाणवत. संभाजी महाराजांच्या जीवनाचा धावता आढावा या पुस्तकात घेतला आहे. हे पुस्तक वाचलं ना तर  आळस कुठच्या कुठे पळून जाईल.... संघर्ष, साहस आणि कृतिवान हे गुण आत्मसात करून जीवन जगणं म्हणजेच शिवराय, संभाजी राजे यांचा मावळा होणं आहे.  हे पुस्तक संभाजी महाराजांचे छोटे चरित्र आहे. दोन्ही छत्रपतींच्या जीवनाचा आपण सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे याची जाणीव या पुस्तकामुळे होते. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज समजून घेतले तर..... जीवनातील Dipression, frustrations आणि क्षुद्र व्यत्ययांना  मोठ संकट समजणं, हतबल होणं आपल्या जीवनातून इतिहास जमा होईल. संभाजी महाराज म्हणजे झंजावात होते. एकाच वेळी त्यांना किती किती आघाड्यांवर लढावं लागलं... खुद्द औरंगजेब ला दक्षिणेत यावं...

जळलेला मोहर - वि स खांडेकर (मेहता पब्लिशिंग हाऊस)

स्त्री - पुरुष यांच्यातील शृंगार हे पाप आहे, असं धर्म, समाज यांच्याकडून बिंबवल जात. शृंगार ही वाईट गोष्ट आहे, या मोहापायी अध्यात्मिक दृष्टया जीवन रसातळाला जात आणि स्वर्ग मिळत नाही या (भंपक)कल्पनेने मनोविकार वाढला आहे. गांधी, विवेकानंद यांना जमलं म्हणून सामान्य लोकांकडून ही अपेक्षा करणं अज्ञान आहे. जळलेला मोहर ही कादंबरी वाचनीय आहे. अखेरच्या पानापर्यंत खिळवून ठेवते. शृंगार, संसारातील गैरसमज, त्यातून होणारी मानसिक सासेहोलपट यावर ही कादंबरी भाष्य करते. सामान्य मानवी जीवनाच्या अत्यंत्य महत्वाच्या पैलूविषयी आपली समज वाढवण्यास  "जळलेला मोहर " मदत करते .  (दुसरी आवृत्ती 1948 ला आली, डॉ साने यांनी लिहिलेली प्रस्तावना अफलातून आहे. पुन्हा पुन्हा वाचावी अशी.डॉ साने यांनी लिहिलेले पत्र पुस्तकातून जशेच्या तसें दिले आहे.मेहता प्रकाशन ने प्रकाशित केलेलं हे पुस्तकं प्रत्येकाच्या संग्रही असलं पाहिजे.नक्की विकत घ्या.) डॉ. साने यांचे पत्र स्त्री-पुरुषसंबंधांच्या बाबतीत आपला समाज अद्यापि फाजील सोवळा आहे, असेच मला वाटते. नैसर्गिक वासनांचा प्रामाणिकपणाने विचार करण्याऐवजी त्यां धार्मिक ...

वारी - व्यंकटेश माडगूळकर

जांभळाचे दिवस, जंगलातील दिवस हे व्यंकटेश माडगूळकर यांचे अनुभव कथन मला फार आवडले. बनगरवाडी ही कादंबरी सुद्धा लाजवाब आहे. वारी हा कथासंग्रह सुद्धा आवडला. पण यात बऱ्याच गोष्टी खटकल्या सुद्धा....त्यांनी जातीआधारित त्यांचे निरीक्षण नोंदवले. कदाचित नेणिवेतून आले असेल, नक्की कस सांगणार??? पण वाचकाने भान न ठेवल्यास गावगाडा, बारा बलुतेदार थोडक्यात नेमाडे सांगतात तो देशीवाद हे चांगले पर्याय होते /आहेत अशी जाणीव / नेणीव नकळत विकसित होऊ शकते. खूप सावध राहून वाचलं पाहिजे. बहुजनांनी Fiction लिहिलं पाहिजे असं अविनाश (ठसन, पतेली या कादंबऱ्याचे लेखक) का म्हणतात हे "वारी" च्या वाचनाने प्रकर्षाने जाणवलं. 💡वारी  या कथेत अर्जुन म्हातारा महार समाजाचा दाखवलाय, त्याचा मुलगा मिळेल तो भाकर तुकडा घेऊन जगतोय. अर्जुन हा वयोवृद्ध म्हातारा पंढरपूरला जाण्याची आस लावून बसला आहे. मुलगा, सून यांना त्याची घालमेल पाहवत नाही. शेवटी अर्जुन पंढरपूर ला जातो. पण चोख्याच्या पायरीवरूनच परत येतो. पांडुरंगाच्या देवळात जाऊन दर्शन न घेता परत येतो. तो म्हणतो... "सरकारनं आमा लोकास्नी तुज्याशी जान्यास परवानग...

डिजिटल मिनिमलिझम - कॅल न्यू्पोर्ट (अनु-रमाकांत दाणी) (मधुश्री पब्लिकेशन)

मी नुकताच रायलिंग पठारावर गेलो होतो. समोरच मनात धडकी भरवणारा नितांत सुंदर लिंगाणा होता. माझ्या शेजारी बसलेले तरुण फोटो आणि शॉर्ट व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते. बाहुबली चे गाणे टाकून रील इन्स्टा वर टाकणार असं म्हणाले. समोर असणारं निसर्गसौंदर्य अनुभवायचे सोडून खूप like मिळतील, त्यांची जळेल अशा आशयाची त्यांची चर्चा सुरु होती. इन्स्टा,फेसबुक, व्हाट्सअप स्टेटस यावर असणारे लाईक बटन याची नशा वाईट आहे. समाज माध्यमात रील,फोटो टाकून आपण नेमकं काय साध्य करतोय? इतरांचं अटेंशन मिळवून नेमकं काय साध्य करायचंय? निराशेच्या गर्तेत जाण्याची ही लक्षण आहेत. आपण जितका जास्त वेळ समाज माध्यमांवर घालवू तितका कॉर्पोरेट कंपन्यांचा प्रॉफिट वाढणार आहे , चंगळ वाद वाढणार आहे. आपल्या आवडीनिवडी सर्व डाटा मिळवला जातोय, जाहिरात कंपनींना विकला जातोय. यासाठी वापरकर्त्याला स्क्रीन टाइम ची लत लावली जातेय. सिगारेटची, तंबाखूची, पान मसाल्याची चटक वाढावी म्हणून कंपन्यांकडून उपाययोजना केल्या जातात. तसंच इंस्टाग्राम, फेसबुक, you tube ... इत्यादी समाज माध्यम आपल्या लाईक, स्क्रीन टाईम नुसार नवनवीन व्हिडिओ सुच...