वॉर्ड नं 7 सर्जिकल - भाऊ पाध्ये
मी भाऊ पाध्ये यांची वाचलेली ही तिसरी कादंबरी. तीनही कादंबरीत भानगड(प्रेम!), विरह, सेक्स आहेच. मानवी मनाला व्यापून टाकणारा दुसरा कोणता विषय असेल?
भाऊ पाध्ये यांच्या लेखणीत एक प्रकारचा कोरडेपणा आहे. ते भावनांचे उदात्तीकरण करत नाहीत. वॉर्ड नंबर ७ मध्ये केवळ आकर्षण नसून ते चुकीच्या वेळी भेटलेली योग्य माणसं किंवा अपूर्ण राहिलेल्या इच्छा यांचे दर्शन घडवते. हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्या, जंतुनाशकांच्या वासात माणसांच्या मनात चाललेली ही 'झोंबाझोंबी' ते फार निर्भीडपणे मांडतात.
🚫 पुढे वाचल्यास कादंबरीचा 'स्पॉईलर' आहे
श्याम पैगंणकर, हा लेखक आहे. तीन पुस्तकं प्रकाशित झालीत. अपेंडिक्स च ऑपरेशन करण्यासाठी ऍडमिट झालाय. त्याची जुनी भानगड (प्रेम?) मोहना कारखानीस तिथे नर्स होती. ते दोघे लग्न करणार होते, पण एनवेळी मोहना ने माघार घेतली. श्याम ने मंदा शी लग्न केले, त्याला एक मुलगाही आहे. पण मोहना त्याच्या प्रेमाच्या आठवणीत अजूनही अविवाहित आहे.
श्याम मोहना ला पूर्वीचे दिवस अनुभवण्याचा प्रस्ताव देतो, ती नाकारते.
हॉस्पिटल मधील तारा सिस्टर श्याम मधील लेखकावर फिदा होते. ते शारीरिक झोंबा झोंबी करतात. ती त्याच्यासमोर एकत्र राहण्याचा प्रस्ताव ठेवते. श्याम मोहना चा झाला नाही, मंदा चा झाला नाही तिथे तारा चा तरी कसा होईल?
ताराने दिलेला प्रस्तावाचा विचार करत श्याम हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतो, तारा समजून जाते.
काही वर्षांपूर्वी श्यामला, मोहना कारखानीस असं सोडून गेली. आज श्याम तारा ला सोडून गेला.
जगात प्रत्येक जण एकदुसऱ्याला वापरून घेत असतो, अपवाद.....असतील का?
_सिद्धेश्वर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा