धर्मप्रसार - म्हणजे नेमकं काय ???
एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं?
चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष,आर्थिक प्रलोभन देतात. धर्मप्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेताना फारसं कोणी दिसत नाही.
प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो." गर्व से कहो हम हिंदू है "" अल्ला हो अकबर " यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहे. धर्म नावाच्या कळपात परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी केलं आहे,करत आहेत.
धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता स्वबुद्धीने विचार,चिकित्सा करून धर्माचे तत्त्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
( बुवाबाजी, मठबाजी, तथाकथित महाराज, स्वामी यापासून दूर रहा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा