मुख्य सामग्रीवर वगळा

राडा - भाऊ पाध्ये

राडा - भाऊ पाध्ये 




समाज वास्तव परखडपणे मांडणे ही भाऊ पाध्ये यांची खासियत आहे. 1975 ला त्यांची 'राडा' कादंबरी प्रकाशित झाली. यामध्ये शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली म्हणून पहिल्या आवृत्तीच्या सर्व प्रती गायब करण्यात आल्या होत्या. मुंबईतील भांडवलदारांनी कामगार चळवळ संपवण्यासाठी, त्यांच्यात फूट पाडण्यासाठी शिवसेनेला ताकद दिली. त्याची कार्यपद्धती या कादंबरीत आहे. काळ, संघटन, राजकीय पक्ष कोणताही असो त्यांना चालवणारे भांडवलदार असतात.

भाऊ पाध्ये निशिद्ध गोष्टी बोलून दाखवण्याचं धाडस दाखवतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.
उदा. 
कादंबरीतील मंदार म्हणतो " आपला बाप नेहमीच भंपक बोलतो. याने असं गोऱ्या कातडीच्या साहेबांवर मरण्यापेक्षा फोरास रोडच्या रांडेवर हा मेला असता तर आपण त्याला मानलं असतं "
"दारात बाप आणि मुकुंद अंकल. म्हणजेच खूबसूरत काकूचा समाजाने मंजूर केलेला ठोक्या. पण अजून काकूचं पोट वर काढणं लेकाला जमलं नाही "
मनाची उलाघाल, विद्रोह व्यक्त करणारे अशाप्रकारचे स्वसंवाद वाचकाला पदोपदी मिळतील.

बाप मुलाचा संघर्ष 
बहिण भावाचा संघर्ष 
खूबसूरत काकू चा मनकल्लोळ 
शिवसेना - कम्युनिस्ट संघर्ष 
कामगारांचा जगण्याचा संघर्ष 
भांडवलदार आणि पुढारी यांचं नातं..... हे सर्व या कादंबरीत आहे. कोण कोणाला कसं वापरून घेतंय हे समजत. जगाची रीत समजते.
या कलयुगात नीती ही पैशावरून ठरत असते हे समजत. एकवेळ नक्की "राडा " वाचावी.

_सिद्धेश्वर 


🚫 पुढे वाचल्यास कादंबरीचा 'स्पॉईलर' आहे 

मंदार अन्नेगिरी -
हा पैसेवाल्या बापाचा वाह्यात (?)मुलगा आहे. शिक्षण सोडलं, घरच्या व्यवसायात शून्य लक्ष दिल इथपर्यंत ठीक..... पण हा मवालेगिरी करणे, दारूच्या गुत्त्यावर जाऊन राहणे, शालिनी खारकरला चालता बोलता असभ्य टोमणे मारणे यात रममाण आहे. हा भामटा घर सोडून गेलाय. घरचे त्याला वैतागले असले तरी तो पुन्हा घरी यावा म्हणून प्रयत्न करत आहेत. 
मंदार हा चित्रकार, संवेदनशील मनाचा होता,परिसरातील वृक्षातोडीच निमित्त होऊन याचा बापाविषयी भ्रमनिरास झाला. नापास होऊन, व्यसनाधीन होऊन, बेभान वागून त्यानी बापाविरुद्ध बंड केलं.त्याची एक चूक..... बाप सर्व सेट करतो आणि मंदार त्याला नको असणाऱ्या मॅट्रिक्स मध्ये अडकतो.
(गुळगुळीत दाढी, कामाच्या मिटींग्स, लग्न, नाटक........)

शालिनी खारकर -
हिचा भाऊ गोरेगाव चा शाखाप्रमुख आहे. आपल्या वागण्या बोलण्या चे Consequences असतात ते भोगायची तयारी शालिनी खारकर ची असावी किंवा तेवढी समज तिला नसावी.
समाज काय म्हणेल, म्हणतो यास फाट्यावर मारून ही मनाप्रमाणे जगतेय. चूक बरोबर हे ठरवणारे आपण कोण? शालिनी -नाफेड च नातं कोणतं? प्रत्येक नात्याला नाव देणं गरजेचं आहे का? लोक काय म्हणतील याचा विचार न करता जगणारी शालिनी धाडसी वाटतेय.(किंवा मूर्ख असेल.)

खूबसूरत काकू -
सो कॉल्ड चांगल्या घरातील खूबसूरत काकू आणि शालिनी खारकर यांच्यात फरक काय आहे? मंदार ने पुन्हा घरी राहायला यावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या काकूचा हेतू नेमका काय असावा? त्याची काळजी की स्वार्थ?

सदानंद शेठ अन्नेगिरी-
हा मोठा कारखानदार आहे. कारखान्याच्या कामाचा व्याप, मुलगा मंदार चा ताप, सरकारी धोरणे यांनी त्रस्त आहे. मुलाने आपलं काम पाहावं,लग्न करून सेट हवं ही याची अपेक्षा आहे. या बाप लेकाच्या संघर्षात दोघेही आपापल्या जागी बरोबर वाटतात.

नानासाहेब खारकर-
हा गोरेगाव चा शाखाप्रमुख आहे. स्वतः रॉबिनहूड असल्याचा याचा दावा आहे. किरकोळ गुंड, दारूचे गुत्ते यांचा बंदोबस्त करून लोकांचा मसीहा बनू पाहतोय. काहीसं लोककल्याण बरचसं स्वहीत यासाठी झुंडशाही चा वापर ही यांची कार्यपद्धती आहे. बहिण शालिनी, राजकीय जीवनात अडचण ठरत असल्याने ती दत्तक घेतलं असल्याचे तो कार्यकर्त्यांना सांगतो आणि कार्यकर्ते विश्वास ठेवतात. कार्यकर्ते नेहमीच मूर्ख असतात, नाही का?

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...