मुख्य सामग्रीवर वगळा

जगणं वाचणं - डॉ राजेंद्र मलोसे

जगणं वाचणं - डॉ राजेंद्र मलोसे 



राजाविज्या पट्टीचा वाचक असतो. कविता वाचून तो बेभान होतो. तिच्या निर्मितीच्या शोधात चालत निघतो. गती प्रगती जागृती.... डॉ जागृती पाटिल यांना भेटतो. तश्या त्यांच्या भेटी आधीही झालेल्या असतात. वाचनात गुंग असणाऱ्या राजाविज्या ला त्या आठवत नसतात. 

ती म्हणाली, तू फक्त वाचत रहा.
तो तिच्याकडे बघत राहिला, त्याला वाटलं ही जगातली सर्वात सुंदर स्त्री आहे.

राजाविज्या च्या बेभान होऊन वाचण्यावर डॉ जागृती भाळतात. त्या कामं करणार, राजाविज्या फक्त वाचणार, त्यांच्यात अलिखित करार होतो. ते एकत्र राहू लागतात. त्या दोघांच्या संवादातून राजाविज्या चा भूतकाळ उलगडत जातो.
जागृती विचारते, तू का इतकं वाचत असतोस?
राजाविज्या म्हणतो "वेळ चांगला जावा म्हणून वाचतो. वाचण्याशिवाय करमत नाही म्हणून वाचतो. बाकीचं सगळं विसरण्यासाठी वाचतो. समाधिस्थ व्हावं म्हणून वाचतो. हे जगणं सुसह्य व्हावं म्हणून वाचतो. माझं मन त्यात रमतं. पुस्तके मला सगळं देतात. ज्ञान, करमणूक, माहिती, कल्पना, सत्य. माझं सगळं दुःख विसरतो मी. माझी सुखाची कल्पना पुस्तके, म्हणून वाचतो. आणि हो ही माझ्या वडिलाची देन आहे. ते खूप वाचायचे, ते आपोआप माझ्यात आलं. ते गेले आणि मी त्यांच्या कपाटातलं आणि या शबनम मधलं वाचायला लागलो."

"तू वाच, तुझं मन रमेल. तू वाच, तुझं मन रमेल. तू वाच, तू वाचशील " राजाविज्या चा बाबा त्याला नेहमी म्हणायचा. तो बाबा अकाली गेला. आई ही सोडून गेली. राजाविज्या आश्रमात जातो. 10 वी पास होतो. नंतर काकाकडे राहायला येतो. काकाची जीव की प्राण असणारी सायकल राजाविज्या कडून हरवते, तो तेथून फरार होतो. भटकत राहतो वाचनालयच्या दारादारातून..... वाचणं सोडत नाही. 

वाचत राहतो. वाचन प्रेमामुळे डॉ जागृती भेटते. मुंबई ला जातात. या वाचणप्रेमामुळे BA, MA, Phd होते. फिरदोस मैत्रीण लाभते. अमेरिकेला पुढील शिक्षणाची संधी मिळते.
एकदा फिरदोस विचारते, पुस्तक काय देतं तुला?
राजाविज्या म्हणतो " कसं दडलेले असतं कुणाचं तरी आयुष्य पुस्तकात.... कितीतरी माणसं पुस्तकात..... किती किती जगणं पुस्तकात.... आनंदाचे झरे, मोरपीसांची हळुवार आठवण पुस्तकात. पुस्तकात आगळेवेगळे विचार असतात, भावभावनांचे अविष्कर असतात."

राजाविज्याला आयुष्यात ज्या संधी मिळाल्या त्या मागे त्याचं वाचन होतं.

💡मनातलं 

चित्रपट पाहताना आपण logic लावत नाही, विशेषतः एकटा नायक 10-12 जणांना चोपतो तेव्हा. तसंच या कादंबरी बाबत आहे. 
बेभान वाचन असणाऱ्या राजाविज्या ला व्यवहार ज्ञान का नसतं?
बुकी मंत्री कसा होतो?
फिरदोस 10-12 मुलं घेऊन अमेरिकेला परत कशी जाते?
भंनंग राजाविज्या ला थेट मंत्रालयात, मंत्र्याच्या दालनात प्रवेश कसा मिळतो?
केंद्र- राज्य पातळीवरील पुढारी इतके उदार, तत्पर कसे?

हे असलं logic नाही लावायचं. 

_सिद्धेश्वर 

💡पुस्तकातील उतारे 

👉🏻एकाच ध्यासाने पछाडलेल्या राजाविज्याला अजून काय पाहिजे? एक छप्पर, दोन वेळा जेवण आणि खूप खूप पुस्तकं. वाचत रहायचं. श्वास घेतो तसं वाचत रहायचं.

👉🏻वेताळा हेच आपलं जग आहे. विश्व आहे. वाचत रहाणं. त्यातच बाकी सगळ दुःख विसरलं जातं. हे कोण काका आहेत ते विसरणं. ते काय बोलतात हे विसरणं. मावशीचं ते सारखं 'आईविना पोर, आईविना पोर' हे विसरणं. वेताळा, कदाचित बाबांना हेच सांगायचं असेल, वाचत राहा. वाचत रहा. जगातल्या सगळ्या त्रासापासून वाचशील. वाचत राहा.
वाचत चल. वाचत, वाचत, वाचत जा.

👉🏻 प्रत्येक गोष्टीबद्दल ज्ञान आवश्यक आहे म्हणून वाच, आपली जिज्ञासा जपलीच पाहिजे.

👉🏻'वाचताना... वाचताना अशीच समाधी लागते. जग विसरायला होतं. आपण कोण आहोत, आपण कुठे आहोत हे विसरतो आपण, किती वेळ गेला, किती युगे गेली, किती जिवंत आहोत आपण, आहोत की नाही आपण, सगळं सगळं विसरतो आपण; पुस्तकांमुळे. बस्स वाचत राहतो.

👉🏻गोलगोल फिरणारी वावटळ. जबरदस्त धुळीची वावटळ... एकात एक एकात एक कितीतरी... काही तरी होतं त्यात.'
'माणसं लिहितात तेव्हा असंच होत असावं त्याचं. सृजन म्हणजे वाचन, वावटळ आणि लिहिणं यांचं मिश्रण असावं.

👉🏻 बापाची लाथ,आईचा आशीर्वाद,मामाचा पैसा 
हा मामा म्हणजे सासरा की आईचा भाऊ 
" हे ज्याने त्याने ओळखावं "

👉🏻मेरा देश महान, ठेवली अक्कल गहाण 

👉🏻बाप लाथ मारी त्याला सासरा मामा तारी 

👉🏻जो वाचत राहिला तो या कडू जगण्यापासून वाचेल.""जो वाचत राहिला तो अज्ञानापासून वाचेल."

👉🏻किताबो का भाई क्या कहना
 वो तो बेताब होते है 
जो उन्हे समज नही पाते
 वो जिंदगीभर रोते है.

 👉🏻खरं तर पुस्तकं असतात कल्पतरू."
"मागेल ते देणारे. डोळे फिरवले तरी हवा तसा आनंद देणारे"
"अमृतही देतील पुस्तकं?"

👉🏻आम्हांला पोट आहे म्हणून नौकरी करतो नाहीतर हे सगळं वाचन बिचन हे वेड आहे वेड. व्यसन आहे व्यसन. दळभद्री व्यसन.....

👉🏻हा चौकशी पण करणार नाही की आपण बागेत का राहतोय?" वेताळ.
"तो कश्याला करेल. खऱ्या मित्राचं लक्षण आहे ते."

👉🏻Reading transformed the world"
"वाचनाने जगच बदललं."

👉🏻 I CAN WAIT...I CAN FAST.... I CAN READ
"I CAN LOVE"

👉🏻 बुद्धीला हृदयाचे मदतनीस बनवा असा संदेश वाचन देत.

👉🏻"पुस्तकं माणसांसारखी नसतात पण पुस्तकं माणसांशी कसं वागावं हे शिकवतात. पुस्तकं आपला अहंकार जर संपवत नसतील तर मग काय कामाचं हे वाचन?"

👉🏻तारुण्याच्या गुर्मीत, तुम्ही वेळेची उधळमाधळ करता. नंतर तोच काळ तुम्हांला कुरतुडून टाकतो. 

👉🏻 आपण चांगले वाचक असाल तर पुस्तकांची काळजी घेतोच घेतो.....जशी आपण स्वतःची काळजी घेतो.

👉🏻 सत्य हे पथहीन असतं. सत्याकडे जाणारा रस्ता नक्की कोणता आहे अजून कोणालाच सापडलं नाही.

👉🏻 फार महत्त्वाचे क्षण आयुष्यात फार कमी येतात.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...