मुख्य सामग्रीवर वगळा

मला काय त्याचे?????

मला काय त्याचे??????


66 वय म्हणजे म्हातारपण, वृद्धत्व आहे कि नाही?
या वयात श्रमाचं काम करायची वेळ का येतं असेल?
झाडाच्या फ़ांद्या तोडणारा हा इसम रोजंदारी वर काम करणारा असणार....
रोजंदारी वर काम करणाऱ्यांना रोज काम मिळेल याची शाश्वती नसते. हाताशी आलेलं काम का सोडावं असा विचार करून झाडाच्या फ़ांद्या तोडण्यासारखं धोकादायक काम यांनी स्वीकारलं असेल का?
किती हजेरी असेल त्यांची 700-800 रुपये?

पोटाची खळगी भरण्यासाठी म्हातारपणात ही धोकादायक काम करावं लागण ते ही सुरक्षेविना यात त्या व्यक्तीच्या बालपण, तारुण्या इतकाच समाज ही दोषी आहे.

तुम्ही, मी, आपण सर्वजण मिळून बनलेला समाज. 

एका ६६ वर्षीय व्यक्तीकडून अशा धोकादायक कामांची अपेक्षा करणं हेच अमानवी आहे. आपल्याला त्यांचा अपमान नाही वाटत कारण ते 'मजूर' आहेत. ही मानसिकता समाजातील असमानतेचं मूळ आहे.

टिप्पण्या