फिडेल, चे आणि क्रांती - अरुण साधू (260525)
मराठा क्रांती मोर्चा ऐन जोमात असताना राजकीय विश्लेषक राजू परुळेकर म्हणाले होते क्रांती करायला इतके लोकं नाही लागत. हातांच्या बोटावर मोजण्या इतपत लोकांकडून क्रांती होते. त्यांचे शब्द खरे होते याची जाणीव फिडेल, चे गव्हेरा यांच वादळी जीवन, कार्य पहिल्यास होते.
आपल्याला न पटणारी, लोकशाही मार्ग डावलून सत्ताधीन झालेली व्यवस्था उलटावून टाकण्यासाठी प्रयत्न करणं, त्याचा ध्यास घेऊन बलाढ्य व्यवस्थेला, अडचणी ना सामोरे जाण, जीव पणाला लावणं हे सर्व विस्मय कारक आहे.
चे गव्हेरा मूळचा अर्जेन्टीना चा होता. पेशाने तो डॉक्टर होता. लॅटिन अमेरिकेत तो फिरला. सामान्य जनतेच्या हालआपेष्टा पाहून तो क्रांतीचा पुरस्कार्ता झाला. फिडेल कॅस्ट्रो चा भाऊ राऊल कॅस्ट्रो याच्यामुळे चे गव्हेरा आणि फिडेल यांची ओळख झाली. फिडेल मुळे प्रभावित होऊन चे गव्हेरा क्युबन स्वातंत्र्य लढ्यात सामील झाला.
फिडेल आणि चे 82 क्रांतीकारकां बरोबर मेक्सिको तून निघाले.(25 नोव्हेंबर 1956 ला निघाले, 2 डिसेंबर ला पोहचले.) क्यूबा च्या समुद्र किनारी उतरले तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला. केवळ 12 क्रांतिकारक बचावले. त्यांनी निबीड अरण्यातून लढा सुरु ठेवला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मनोबल कसं टिकवलं असेल? त्यांनी लढा कसा लढला यासाठी पुस्तक वाचावं.
1 जानेवारी 1959 बॅटिस्ता अमेरिकेला पळून गेला आणि क्यूबा स्वतंत्र होऊन संपूर्ण सत्ता फिडेल कॅस्ट्रोच्या हातात आली.
भांडवलवादी बलाढ्य अमेरिका चा विरोध झुगारून बॅटिस्ता ची जुलमी राजवट उलटावून फिडेल, चे गव्हेरा आणि इतर क्रांतिकारक यांनी सत्ता हस्तगत केली. त्यावेळी फिडेल च वय होतं 32 वर्षे आणि चे गव्हेरा चे 29 वर्षे.
फिडेल ने भांडवलशाहीला पूर्ण विरोध करून समाजवादी राज्याची स्थापना केली.
फिडेल च्या मंत्रिमंडळात चे गव्हेरा उद्योगमंत्री होता. त्याला क्यूबा च नागरिकत्व ही देण्यात आलं होतं. क्रांती यशस्वी झालेली, चे गव्हेरा क्यूबा त आरामात जीवन जगू शकला असता पण.....
लॅटिन अमेरिकेतील इतर देशात ही क्रांती घडवून आणायची या हेतूने चे गव्हेरा ने क्यूबा सोडला. बॉलिविया देशात क्रांती करण्याच्या उद्देशाने तो गेला पण 9 ऑक्टोबर 1967 रोजी अमेरिकेच्या CIA च्या मदतीने त्याला मारण्यात आले. तेव्हा चे 39 वर्षाचा होता.
( एखाद्या अग्निशिखेप्रमाणे चे गव्हेरा च जीवन होतं. तेवढंच भडक आणि शुद्ध. पैसा, ऐश्वर्य, सुखासीनता या भावनाच त्याला माहीत नव्हत्या. त्याने आपली सारी ताकद दुसऱ्यांसाठी वाहिली. अंगीकारलेल्या व्रता विषयीच्या त्याच्या निष्ठा सखोल होत्या आणि त्यासाठी त्याने दिव्यही सोसले भयानक. )
क्रांती ही कधीही न संपणारी प्रक्रिया....
👉🏻 अत्यंत निराशा जनक परिस्थितीतही कॅस्ट्रोचा आत्मविश्वास विलक्षण होता आणि त्याच्या या आत्मविश्वासानेच सगळ्यांना हुरूप येत होता.
👉🏻 कशीही परिस्थिती आली तरी, प्रबळ शक्ती म्हणून कुणापुढे वाकायचे नाही , ही कॅस्ट्रोची जिद्द होती.
👉🏻 विजय मिळेपर्यंत झगडत राहायचे हा फिडेल चा स्वभावच होता.
👉🏻 पराभव हा मानण्यावर असतो.पराभव हा शब्दच फिडेल कॅस्ट्रोच्या शब्दकोशात नव्हता आणि नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा