ब्राह्मणी धर्मशास्त्रानुसार मराठे शूद्रच - प्रवीण गायकवाड (170925)
मानवी जीवनात धर्माचे स्थान काय?
हिंदू हा खरच धर्म आहे का?
बहुजन समाजाला हिंदू धर्मात स्थान काय?
शिवधर्म काय आहे? त्याची तत्व कोणती आणि त्याची गरज का?
या प्रश्नांचा वेध घेण्याची जिज्ञासा उत्पन्न करणार संक्षिप्त मुद्देसूद आणि विचार प्रवर्तक लिखाण या पुस्तकात आहे.
बहुजन कोण?
हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्यांना शूद्र ठरवले ते बहुजन अशी व्याख्या करता येईल.
(याला ही मर्यादा आहेत)
शुद्र कोणाला ठरवलं?
पुराणानुसार परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली. क्षत्रियांच्या स्त्रिया नियोगासाठी ब्राह्मण ऋषींकडे गेल्या आणि वंश वाढवला. त्यामुळे आता कोणीही क्षत्रिय राहिलेलं नाही.
( गोत्र माहीत नसलं की "कश्यप" सांगतात. आपली जन्म पत्रिका हा आपल्या मानसिक गुलामीचा आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार शूद्र असण्याचा पुरावा आहे. )
हिंदू धर्म आहे का?
भगवत गीता,अठरा पुराणे आणि चार वेद यामध्ये कोठेही हिंदू धर्म असा उल्लेख नाही. यजुर्वेद मध्ये ब्राह्मण धर्म असा उल्लेख आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार हिंदू ही जगण्याची रीत आहे. (it is a way of life.)
समजा इतर कोणत्या धर्माचे शे दोनशे लोक हिंदू व्हायचं म्हणून आले तर त्यांना कोणत्या जातीत टाकणार?
1)ख्रिश्चन धर्मात प्रवेश घेण्यासाठीचा मुख्य संस्कार बाप्तिस्मा आहे.
2)मुस्लिम धर्मात प्रवेश करण्यासाठी "शहादा" (ईमानाची साक्ष) उच्चारावी लागते.
3) बौद्ध धर्म स्वीकारताना व्यक्ती "त्रिशरण पंचशील" म्हणते.
4)शीख धर्म यात प्रवेशासाठी “अमृत संस्कार” केला जातो.
5) हिंदू धर्मात फक्त ब्राह्मणांना मुंज हा उपनयन संस्कार केला जातो कारण त्याशिवाय वेदांचा अभ्यास करणे,यज्ञ करणे मान्य नव्हते. आणि इतर समाजाला तर तो अधिकारच नव्हता. त्यामुळे त्यांची मुंज होण्याचा प्रश्नच नाही.
बाळ गंगाधर टिळक म्हणायचे, "जो वेद प्रमाण मानतो तो हिंदू" आणि शूद्रांना तर वेद वाचायचे राहूद्या, ऐकायला ही धर्माशास्त्रानुसार परवानगी नव्हती. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी वेदांचा अर्थ लावला म्हणून तर त्यांच्या गाथा इंद्रायणीत बुडवण्यात आल्या.
" तू शूद्र आहेस, तू राजा होऊ शकत नाहीस " असं खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना ही सनातन धर्माचा उदोउदो करणाऱ्या मनुवादी व्यवस्थेकडून ऐकावं लागलं.
राजश्री शाहू महाराज यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार नाकारण्यात आला हे तर सर्वज्ञात आहेच.
मराठा, राजपूत वा इतर कोणी क्षत्रिय असल्याचा बढावा करत असेल, गाडीवर "क्षत्रियकुलावतंस" लिहीत असेल तर त्यांनी एक प्रकारे चातुर्वर्ण व्यवस्थाच मान्य केलेली असते.
मनुस्मृति, बुवा बाबा, स्वामी, महाराज, भिक्षुकशाही यांच्या जोखडातून मुक्त होऊन मनगट, दंड, मणका आणि बुद्धी याच्या जोरावर स्वतःबरोबर समाजाची आर्थिक,मानसिक उन्नती साधावी, त्यासाठी सतत प्रयत्नशील असाव ही "शिवधर्माची" शिकवण आहे.
_सिद्धेश्वर
( पुस्तक खरेदी करून वाचावं. सेवामूल्य 100/-₹, जिजाई प्रकाशन )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा