निवडक नरहर कुरुंदकर खंड 2,ग्रंथवेध भाग 1
(200325)
नरहर कुरुंदकर यांनी बऱ्याच पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या, त्यातील आठ प्रस्तावना या पुस्तकात आहेत. (समीक्षा )
हे पुस्तक मी प्रयत्न पूर्वक वाचलं. माझी आकलन शक्ती किती तोकडी आहे याची मला जाणीव झाली.
करुंदकर यांनी रणजीत सावंत लिखित श्रीमानयोगी कादंबरी ला प्रस्तावना लिहिलीत. शिवाजी महाराजांकडे पाहायचा दृष्टिकोन बदलतो, चौरस विचार कसा करावा हे समजत. लेखाच्या ओघात त्यांनी दादोजी कोंडदेव, रामदास, अनाजी पंत चिटणीस यांची भलामन केलेली पटली नाही.
इरावती कर्वे यांच्या संस्कृती पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना लिहिलीत. या बाई मानववंश शास्त्रज्ञ होत्या. वयाच्या पंचविसाव्या वर्षी विदेशात जाऊन पदवी संपादन करणं, संसार करता करता संशोधनाचे कार्यही करणे ही जिद्द यांना कोठून येते? जातीव्यवस्था वर्ण व्यवस्थेतून आलेली नाही हे कुरुंदकरांनी यात पटवून दिलेल आहे. माझं पूर्व संस्कारीत मन हे मानायला तयार नाही हा भाग वेगळा.
राची ढेरे यांच्यावर लिहिलेल्या लेखात शैव वैष्णव परंपरा, महानुभाव पंथ व वारकरी पंथ याविषयीचे विवेचन केलं आहे.
(हा लेख वाचनं फार कष्टदायक होतं. काहीच समजत नव्हतं. आपला आवाका किती आहे? संशोधन, समर्पण म्हणजे काय असतं? या जाणीवेसाठी वाचावा .)
महाडचा चवदार तळे सत्याग्रह हा सत्याग्रह नव्हताच असं ते मांडतात, त्याची कारणमिमांसाही करतात. अधिवेशन महाडला घेण्याची, त्याचे अध्यक्षपद आंबेडकरांनीच भूषवावे असा आग्रह, चवदार तळ्यावर जाऊन जाहीर रित्या पाणी पिणे या सर्वांच्या मागे आनंद चित्रे ही ब्राह्मण व्यक्ती होती असं ते मांडतात.
गांधी आंबेडकर यांच्यातील पुणे करार याविषयीची नवीन माहिती मिळते. दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिले असते तर त्यांना 71 मतदारसंघ मिळणार होते, संयुक्त मतदार संघ स्वीकारल्याने 151 मतदारसंघ मिळाले. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोघांचाही विजय होता.
या पुस्तकातील काही मतं पटत नाही, बरं नाही पटली तर ते खोडून टाकायला तसं प्रमाण पण दाखवता यायला पाहिजे, तेवढा अभ्यास आणि तयारी माझी नाही, मग त्यांनी काढलेला निष्कर्ष निमूट स्वीकारायचा का?
_सिद्धेश्वर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा