चित्रपट
चमकीला
स्वतःला धर्माचे ठेकेदार समजणारे दहशतवादी कलाकारांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादतात. धर्म, नैतिकता याचे अर्थ हे धर्मांध ठरवू लागले आणि समाजावर लादू लागले की अराजक निर्माण होतं. यात स्त्रिया, कलाकार, सामान्य जनता यांची होरपळ होते.
35-40 वर्षांपूर्वी पंजाब राज्य धर्मांध दहशतवादा मुळे अस्थिर झालेल.हजारो निष्पाप नागरिकांचा हकनाक बळी गेला, त्यातलाच एक "अमर सिंग चमकीला "
'जात' हे भारतीय समाजाच वास्तव आहे.चांभार जातीत जन्मलेला चमकीला पोटाची खळगी भरण्यासाठी कापड गिरणीत काम करायचा. गाणं लिहिणं, चालीत म्हणणं, वाद्य वाजवण ही त्याची आवड होती. त्याच्यातील कलाकार त्याला स्वस्थ बसू देतं नाही, चमकीला नोकरी सोडून स्वप्नांचा पाठलाग करायचं ठरवतो.
आवडणारं काम करायला मिळणं, त्यातून बऱ्यापैकी पैसा येणं हा दुर्मिळ योग अमर सिंग चमकीलाच्या आयुष्यात त्याने हिंमत दाखवल्यामुळे आला.
चमकीला गाणं गाणारी स्वतःची पार्टी उभी करून जनतेच मनोरंजन करतो. अल्बम येतात, परदेशात त्याचे कार्यक्रम होतात, पैसा येतो, सर्व ठीक सुरु असतं. पण
" तुझी गाणी अश्लील आहे ती म्हणायची बंद कर, पोटापाण्यासाठी दुसरा उद्योग कर "असा फतवा धर्मांध दहशतवाद्याकडून येतो.
चमकीला काही काळ थांबतो,पण आतील उर्मी त्याला स्वस्थ बसून देत नाही. एक ना एक दिवस सर्वांनाच सरणावर जायचे आहे याची जाण असलेला चमकीला त्याच्या स्वप्नांचा पाठलाग करत राहतो.
८ मार्च १९८८ चमकीला, त्याची पत्नी आणि दोन साथीदार यांना गोळ्या घालून ठार मारलं जात. अमरसिंग चमकीला त्यावेळी २८ वर्षाचा होता.
एखाद्या गोष्टीचा ध्यास असणं, नाद असणं त्यापायी यशाच्या समाज मान्य कल्पना, आर्थिक स्थैर्य झुगारून जीवन जगणं किती जणांना श्यक्य होतं? असे कित्येक कलाकार ९ ते ५ मध्ये गुरफटून गेले असतील ?
( नेटफ्लिक्स वर चमकीला चित्रपट उपलब्ध आहे. पाहिल्यास वेळ सत्कारणी लागेल.)
_सिद्धेश्वर (130624)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा