नरकातला स्वर्ग - संजय राऊत (081025)
ज्यांनी त्याग केलाय, बलिदान दिलंय अशांना किती काळ आपला समाज लक्षात ठेवतो? कित्येक स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक, वैज्ञानिक, सत्याग्रही यांनी समाज उन्नती साठी सर्वोच्च त्याग केला.
पण
मला काय त्याचे..... असं म्हणून आपल्याच चौकटीत अय्याशी करत राहणारा मध्यमवर्गीय मुर्दाड समाज आज कशानेच अस्वस्थ होत नाहीये. मग संघर्ष कोणी? कोणासाठी? कशासाठी करायचा? असा विचार मनात येऊन जातो.
तडजोड स्वीकारली तर पैसा, पद, प्रसिद्धी मिळणार, अय्याशी सुखनैव उपभोगता येणार याची खात्री असूनही काही धुरंधर व्यक्तिमत्व तो मार्ग स्वीकारत नाहीत.
यांची जडणघडणं नेमकी कशी होते?
यांना संघर्षाची प्रेरणा कोठून येते?
तथाकथित बनावट पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांना ईडी कडून अटक होते. ऑर्थर रोड कारागृहात त्यांनी 101 दिवस काढले. ईडी , तुरुंग प्रशासन यांची कार्यपद्धती आणि आपली राजव्यवस्था याबाबतचे त्यांचे अनुभवकथन शासन व्यवस्थेचे विक्राळ स्वरूप दाखवते.
अखेरच्या पानापर्यंत उत्कंठा आणि थरार देणारं हे अनुभवकथन वाचलंच पाहिजे.
संघर्ष करण्याचे, लढा देण्याचे बळ अशाच अनुभवामधून येते.
💡पुस्तकातून
👉🏻"तुमची बाजू सत्याची असेल तर मागे हटू नका. संकटाला घाबरू नका. संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभे रहा"
👉🏻"युद्ध अद्याप संपले नाही. ते सुरूच आहे. प्रत्येकाला आपापले युद्ध लढावेच लागले. मग तो श्रीराम असेल नाहीतर गौतम बुद्ध! युद्ध हे निर्भयपणे लढायचे असते. बेडर बनून न्यायासाठी लढणाऱ्यांनाच लोक लक्षात ठेवतात"
👉🏻मारता मारता मरावे आणि लढता लढता जगावे.
👉🏻अपना अपना युद्ध सभी को
हर युग मै लडना पडता है |
और समय के शिलालेख पर
खुद को खुद गढना पडता है ||
👉🏻गरीब, कमजोर लोकांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी जे लोक घाबरतात ते डरपोक लोक गुलामच असतात.
_ संजय राऊत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा