इधोस- डॉ कृष्णा भवारी
धोंड्या, हौसा, मंगाजीराव , बाळबा, काळ्या, भामा,मारत्या,धावज्या,नामद्या, बब्या, पांडबा.... आणि बेगडेवाडी.
रानमेवा खाऊन जगणारी ही साधी माणसं, भले गरिबीत, आभावात जगत असतील पाण त्यात दारिद्र्य नव्हतं. भोवतालची झाडं, पायवाट,जल- जंगल -जमीन याच्याशी एकरूप असलेली. शेती करायची, हिरडा काढायचा हेच यांचं उत्पन्न. जे काही येईल त्यात बाजार करायचा.
बेगडेवाडी हे गाव योजून लेखकाने आदिवासी लोकांची जिंदगी, रितिरिवाज मांडले आहेत. शिकारीला जाण, धोंड्याच लग्न त्यापायी साऱ्या गावाची धावपळ,मटन खाऊन पोट डांबरल्यावर भगताला बोलावणं, मासे - खेकडे धरायला जाणारे धावज्या, नामद्या. मंगाजी पाटलाचं तर्हेवाईक वागणं अशा अनेक प्रसंगातून आदिवासी लोकं, त्यांचं गाव, त्यांची जगण्याची रीत वाचकाला मोहवून टाकते.
पण... बेगडेवाडी च्या लोकांना विस्थापित व्हावं लागणार आहे, त्यांची इच्छा नसताना.
निसर्गपूरक जीवनशैली असणाऱ्या आदिवासीनाच कधी अभयारण्य साठी,कधी धरणासाठी, कधी कोळसा खाण साठी विस्थापित व्हावं लागत. पिढ्यानंपिढ्या जल -जंगल -जमीन याच्याशी असलेली नाळ तुटणं हे किती यातनामय असेल? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा डॉ कृष्णा भवारी लिखित 'इधोस '.
(ता. क. हिंदुत्ववादाच्या नावाखाली जहरी विष पसरवणाऱ्या विषारी संघटना आदिवासींना वनवासी म्हणू लागले आहेत. आदिवासींची असणारी वेगळी ओळख पुसून त्यांचं ब्राह्मणीकरण वेगाने सुरू आहे.)
(ग्रामसभेचा ठराव नसताना छत्तीसगढ मधील हाथरस ची जमीन कोळसा खाण प्रकल्पसाठी अदानीला देण्यात आली. स्थानिक आदिवासीच दमन करण्यात आलं. लाखो झाडांची कत्तल झाली.प्रसार माध्यमात यांचा आवाज नाही.
विकासाच्या नावाखाली जंगल हडप करून आदिवासीवर वरवंटा फिरवतात, स्थानिक जनतेचं मत नाकारलं जातंय. याच उदाहरणं म्हणजे 'हाथरस'. तिथेही आदिवासीच्या जीवनाचा 'इधोस' झालाय.)
👉🏽भाकरीला कोंडा उशाला धोंडा, अंगावर चिंध्या अन् झोपायला दुंद्या, घेणार्या माझ्या समस्त आदिवासी बांधवांना!
👉🏽“या बांबलीच्यांना काय माहीत, एका हिरडेच्या दान्यासाठी मानूस शेंडेच्या बुंध्यावं जाताय.”
👉🏽“दिसायाच तेवढा रुबाब. ‘बोलनं पोपटाचं अन् करनी गिधाडाची.”
👉🏽“आरं, म्हनत्यात ना, गोरा तो गुवाचा खोरा अन् काळा तो मोत्याचा जाळा!”
👉🏽“बाप तसा बेटा अन् कुंभार तसा लोटा."
👉🏽‘उधारीचं पोतं अन् हातभर रितं.’
👉🏽मेलेल्या मानसाच्या गांडीत पिळला तं उठून पळंल इतका आंबाट.
👉🏽“कॉनाच्याय नादी लागावा पन दारुड्याच्या नादी लागू नये.”
👉🏽गळ्यात माळ अन् पॉटात काळ..
👉🏽‘वाण्याचा घोडा अन् पाटलाचा भूषाण’ अशी तर्हा झाली.
👉🏽‘कलीयुगाची झालेय भेळ, लावलं रताळं आलंय केळं.’
👉🏽आगीन गाडी, बिगीन गाडी बाळा हिच काय रे सासुरवाडी
👉🏽आज लगीन, दारी आनंद बापाच्या डोळ्याला पानी तुझ्या लग्नाची, तुझ्या लग्नाची बोलते आता मी गानी...
👉🏽“बाळ्या, ये पॉरा. आरं, म्हनत्यात, भावकी तोडावी पन गावकी तोडू नये. लांबचा इचार कर. लय वरतोड बोलू नको.”
👉🏽“दारू पिईन तं गाढवीचं मूत पिईन.”
👉🏽आता ‘जीव जाव का जिलाबी खाव’ लढायचा म्हनजे लढायचा.”
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा