तरुणांईसाठी दाभोळकर - परशराम राऊ अर्डे (270324)
डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी सुरु केलेल्या चळवळीचे बिनीचे साथीदार प र अर्डे त्यांना दाभोळकर जसे दिसलें ते या पुस्तकातून मांडतायेत.
चार पाच तरुणांशी संवाद होतोय यातून दाभोलकरांचे कार्य, विचारप्रणाली, त्यांना आलेल्या अडचणी, कार्यकर्त्यांच्या साहाय्याने त्यावर केलेली मात, कायदा यावा यासाठी 18 वर्षे केलेला संघर्ष या सर्व बाबींचे दास्तावेजकरण या पुस्तक रूपाने झाले आहे.
प रा अर्डे हे भौतिक शास्त्राचे प्राध्यापक होते, आपलं काम सांभाळून त्यांनी 1985 पासून ते अखेरच्या श्वासापर्यंत अनिस चळवळीला योगदान दिले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र चे दीर्घ काळ सहसंपादक राहिले.
आपण महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो (?) त्याचं श्रेय दाभोळकर, अर्डे,अविनाश पाटील यासारख्या ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांना जातं. स्वतःचा वेळ, पैसा खर्च करून विवेक वाद वृद्धिंगत करण्यासाठी झटत असणारी ही माणसंच जग सुंदर करत आहेत.
चळवळीचा धावता आढावा या पुस्तकात घेतला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वाचनात हे पुस्तक यायलाच हवं.
माणसाला माणूस म्हणून वागवणारा, शोषण विरहित समाज निर्माण करण्यासाठी विवेकवादी होऊ या.
_सिद्धेश्वर (270324)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा