मुख्य सामग्रीवर वगळा

इंडिया इन स्लो मोशन - मार्क टुली (अजित ठाकूर)

इंडिया इन स्लो मोशन - मार्क टुली (अजित ठाकूर) (130126)



मार्क टुली हे बीबीसी चे पत्रकार होते. भारतीय राजकारणी आणि नोकरशहा यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध आला. दीर्घकाळ भारतातील वास्तव्य, त्यात पत्रकारितेचे काम यामुळे त्यांचा अनुभव विशाल आहे. त्यातील काही ठळक अनुभव या पुस्तकात मांडले आहेत.

भारतीय राजकारण,नोकरशाही, समाज याविषयीच आपल आकलन वाढवणारे हे पुस्तक वाचनीय आहे.

भारताच्या प्रगतीचा क्रमांक एक शत्रू निगरगट्ट नोकरशाही आहे या निष्कर्षापर्यंत वाचक येतो.

💡श्रीरामाचा नव्याने शोध 

6 डिसेंबर 1992, बाबरी मशीद पाडली तेव्हा लेखक स्वतः तिथे उपस्थित होते. तो घटनाक्रम त्यांनी सांगितला आहे. सहा-सात वर्षानंतर ते पुन्हा अयोध्येला जातात. त्यांना आयोध्या हे क्षेत्र कसं वाटलं? त्यांनी काय पाहिलं? याचे विस्तृत वर्णन या लेखात आहे.
हिंदू समाज, बहुजन बांधव कर्मकांडांच्या चक्रव्यूहात अडकलेले होते, आहेत. काहीच बदललेलं नाही हे जाणवून निराशा येते. 

💡अपात्री दान 

बालमजुरीच्या निर्मूलनासाठी झटणारा एकाकी कार्यकर्ता कैलास सत्यार्थी..... लाब... लाब.... प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी असू शकते,असते.

गालिचा तयार करणारे, विणकाम करणारे तीन लाख पेक्षा जास्त बालमजूर आहेत असं भासवून कैलास सत्यार्थी व रुग्मार्क कंपनी यांनी बरंच नावं कमावलं, पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी होती. या प्रकरणाचं शीर्षक अपात्री दान किती सार्थक आहे याची जाणीव होते.

सामाजिक काम करणारे, तसा भास निर्माण करणारे..... यांचेही पाय मातीचेच असतात.(बऱ्याचदा)

खरा नायक नेहमीच पडद्यामागे राहतो का? एडवर्ड ओकली सारखा!

💡 चर्चचे बदलते अंतरंग 

गोव्यातील चर्च चा, तेथील वेगवेगळ्या उपासना पद्धतींचा मागोवा या लेखात घेतला आहे. विचारी मनाला निराश करणारी, भातुकलीच्या खेळा समान असलेली पूजा पद्धती जवळपास सर्वच धर्मात आहे. हालेलुया हालेलूया म्हणून नाचल्याने आजार कधी बरे होतात का?

जगात चमत्कार नसतो, चमत्काराचा दावा करणारे धूर्त असतात, त्यावर विश्वास ठेवणारे पढतमूर्ख असतात.

💡 सायराबाद ची निर्मिती 

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या चंद्रबाबू नायडू यांना लेखक भेटतात. त्यांच्या सरकारकडून डिजिटल संगणीकृत सेवांचा बोलबाला सुरू असतो, याविषयी जाणून घेतात. विरोधी पक्षनेते, उच्च प्रशासकीय अधिकारी यांनाही भेटतात. लेखकाचे अनुभव वाचल्यानंतर चंद्रबाबू नायडू यांचे कौतुक वाटते, त्यांच्याकडे दूरदृष्टी होती.

( आज रोजी त्यांचे राजकारण फॅसिस्ट वादाकडे झुकलं आहे असं वाटतं.)
भारतीय नोकरशाहीची स्थितीवादी वृत्ती भारताच्या विनाशाचं कारण ठरत आली आहे.या परिस्थितीत आजही फरक नाही असा अनुभव येतोय.

💡 सुफी आणि एक साधा भोळा धर्म 

बऱ्याचदा सत्य काय आहे हे जाणून न घेता आपण काही धारणा बनवतो. भारतात,जगात इस्लामबद्दल तस झालेल दिसत.
निजामुद्दीन एक्सप्रेस मला माहित होती,पण निजामुद्दीन हे एक पीर आहे. संगीत, कव्वाली याचा ते स्वीकार करतं. ही एक सुफी परंपरा आहे . याउलट तबलीघी विचार आहे. तो पीर, संगीत, कव्वाली यांना मान्यता देत नाहीत.
सर्व शक्तिमान अल्लाच्या आराधनेसाठी पीरची आवश्यकता नाही असे तबलीघीचं म्हणणं आहे.
आधुनिकतेकडे, आजच्या जीवन मूल्यांकडे तबलिघीनीं पाठ केली आहे.

सुफी विचार संत परंपरेला मानणारा आहे. मुस्लिम समुदायाचे व्यापक हीत या विचारात आहे असं वाटतं.


💡पुस्तकातील काही उतारे 

👉🏻बऱ्याच वेळा मला असं जाणवतं की भारतामध्ये सरकार हीच जनतेची समस्या आहे, समस्येचं उत्तर नाही.

👉🏻भारतातील राजकीय नेत्यांनी देशासमोर असलेली सगळ्यांत स्पष्ट समस्या म्हणजे 'वाईट प्रशासन' या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं असतं तर या कालबाह्य पद्धती केव्हाच लय पावल्या असत्या; परंतु त्यांच्याच हितसंबंधांच्या ते आड आलं असतं म्हणून राजकारण्यांनी जातीपातीचे प्रश्न उकरून काढून मतदारांचे लक्ष मुद्दाम दुसरीकडे वळवले आहे.

👉🏻 वाईट प्रशासन हीच भारताच्या प्रगतीला खीळ घालणारी सर्वात गंभीर गोष्ट आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...