मुख्य सामग्रीवर वगळा

परिवर्तनाचे दोन पाईक

परिवर्तनाचे दोन पाईक महात्मा ज्योतिबा फुले आणि न्यायमूर्ती रानडे - मधू दंडवते(140925)



जनतेचे हित पाहण्यासाठी, तिला योग्य दिशा देण्यासाठी राजकारण असतं असं समजून राजकारणात येणारी एक पिढी होती, त्यातील मधू दंडवते हे एक....

मधु दंडवते आपल्या कोकणातील राजापूर मतदारसंघातून सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले. जनता सरकारमध्ये रेल्वेमंत्री, व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री आणि 96-97 साली नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.

प्रबोधनाचे अग्रदूत असणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या विषयी त्यांनी दोन भाषणे केलेली ती या पुस्तकात आहेत.

दैववाद, अंधश्रद्धा यातून भारतीय समाज बाहेर यावा, पाश्चिमात्य प्रबोधनाच्या विचारांचा अंगीकार करून भारतीय समाजाने उन्नती करावी असं या दोन्ही महापुरुषांचे मत होतं. इंग्रजी राज्य हे इष्टापती आहे असं दोघांचही मत होत. सामाजिक काम करण्यासाठी संस्थात्मक रचना हवी या विचारातून दोघांनीही संस्थात्मक कामाची उभारणी केली.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची, न्यायमूर्ती रानडे यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली.
स्त्रियांची उन्नती झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही असे या दोघांचेही मत होतं, त्यानुसार त्यांनी कृतीही केली. 

न्यायमूर्ती रानडे यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला पण स्वतः विधुर झाल्यानंतर विधवेशी विवाह न करता रमाबाई (13 वर्षे) यांच्याशी विवाह केला. रानडे यांनी त्यांच्या विधवा बहिणीचा पुनर्विवाह कधीही घडवून आणला नाही. असो..

महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या, विधवा विवाहाचा पुरस्कार करून बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली, यशवंत हा मुलगा दत्तक घेतला, विधवांचे केशवपान होते त्या विरुद्ध नाभिकांचा संप घडवून आणला. हंटर कमिशन समोर बहुजनांच्या शिक्षणाची विदारक परिस्थिती मांडली. मानवी उन्नतीसाठी सार्वजनिक सत्यधर्म सांगितला....(शब्द मर्यादा मुळे थांबतो.)

सर्व संस्था, शासन,राजकारण,धर्मकारण यांचा उद्देश आहे मानवाचा विकास...
या मानवी विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे यांनी समाजातील प्रस्थापितांशी संघर्ष केला. ही प्रेरणा आपल्या मनात चेतवली जावी यासाठी हे पुस्तक खरेदी करून वाचा.

(साधना प्रकाशन, किंमत 75 रुपये)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...