मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126)
गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.
एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला.
वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्यावर शेती घेतली. कालांतराने बैरागड मध्येच वसीम नामक गावकाऱ्याची शेती लिलावात विकत घेतली. त्यांची शेती आजतागायत तोट्यात गेली नाही. शेती बरोबरच त्यांनी गाई, बकऱ्या सांभाळल्या. दूध दही भाजीपाला दारोदारी जाऊन विकण्यात डॉ स्मिता कोल्हे यांनी पुढाकार घेतला. यातून महिला वर्गाशी त्यांचा ऋणानुबंध जोडला आणि त्यांच्या अडीअडचणीला त्या उभ्या राहिल्या.
व्यवस्थेकडून, गावातील प्रस्थापितांकडून आदिवासी समुदायावर अन्याय व्हायचा. आव्हान स्वीकारायचं म्हणून त्यांनी स्वस्त धान्य दुकान(रेशन) चा परवाना घेतला. प्रामाणिक पणे धान्य वितरण करून महिन्याला 1500-2000 रुपये मिळू लागले. यातून अडल्या नडल्या आदिवासीना ते आर्थिक साहाय्य करू लागले. धान्य वितरण व्यवस्थेत त्यांनी सुधारणा घडवून आणल्या. रस्त्या चा विकास व्हावा यासाठी पाठपुरावा केला.
1996 साली बैरागडला प्राथमिक आरोग्य केंद्र झाले. यासाठी आदिवासी समूहाची दफनभूमी चीं जागा घेतली. ग्रामपंचायत ने केलेल्या या अन्यायाचे निवारण करण्यासाठी डॉक्टर स्मिता कोल्हे राजकारणात आल्या. पहिल्याच प्रयत्नात बिनविरोध निवडून येऊन त्या उपसरपंच झाल्या. तिथे त्यांच्या वाट्याला कोर्ट कचेरी, मनस्ताप आला. खोट्या ॲट्रॉसिटी च्या केस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये त्या निर्दोष सुटल्याच पण खोटी केस केली म्हणून मान हानीचा दावा केला आणि एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळवली.
डॉ रवी कोल्हे यांनी विटभट्टी चा व्यवसाय ही करून पाहिला. यातून आदिवासी तरुणांचा त्यांना उद्धार करायचा होता पण दुर्दैवाने यात अपयश आलं.
यात्रेच्या निमित्ताने पशु बळी देणं ही परंपरा आदिवासी समाजातही आहे. निमित्त काही असो पण त्यानिमित्ताने प्रोटीन चीं शारीरिक गरज भगवण्यास मदत होते. डॉ रवी कोल्हे यांच्या वर गांधी विचारांचा प्रभाव आहे. पशु हत्या पाहून त्यांचं मन द्रवलं. हे थांबावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
धर्मांतराच्या विषयात आपण हात घालायला नको अशी डॉक्टर रवी कोल्हे यांची इच्छा होती पण डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव होता. बैरागड मधील आमिष दाखवून झालेले धर्मांतर त्यांनी हाणून पाडलं यामुळे गावातील श्रीमंत मुस्लिम त्यांच्यावर नाराज झाले. यातून हल्ले ही करण्यात आले.
1996 ला प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन झाल्यानंतर डॉक्टर रवी कोल्हे यांनी शेती, पशुपालन, निवासी शिबीर घेऊन तरुणांना मार्गदर्शन करणे याला प्राधान्य दिलं.
डॉ रवी कोल्हे आणि त्यांच्या पत्नी डॉ स्मिता कोल्हे यांनी मेळघाटच्या बैरागड गावात केलेल्या सामाजिक कामाचा विस्तृत लेखाजोखा या पुस्तकात आहे.
💡मनातलं
डॉ कोल्हे दांपत्य म्हणजे, समाज मान्यतेच्या कल्पना झुगारून मनाप्रमाणे जगण्याची हिंमत दाखवणारी जिगरबाज माणसं. बैरागड सारख्या भागात जाऊन राहण्याचा निर्णय त्यांचा स्वतःचा होता. तिथे त्यांनी काय त्रास सोचला कशा पद्धतीने राहिले हे सांगण्यात काही पानं खर्च केलीत.(ऋतुचक्र) ते कंटाळवाण वाटतं.
एखाद्या व्यक्ती वर biopic चित्रपट बनवताना दिग्दर्शक ज्याप्रमाणे सिनेमॅटिक लिबर्टी वापरतो तसंच मृणालिनी चितळे यांनी केल्याचा प्रत्यय बऱ्याचदा येतो. (पान क्र- 75,90....) यामुळे तर्क शाबूत ठेऊन वाचणाऱ्याचा निरस होतो.
डॉक्टर कोल्हे यांचा मुलगा जन्मताच न्यूमोनिया ग्रस्त होता. उपचारासाठी शहरात जायचीं त्यांना संधी होती पण त्यांनी ती नाकारली. आदिवासी बांधवांना ज्या सुविधा मिळत नाही त्या आपण घ्यायच्या नाही हा त्यांचा निश्चय होता. उपचार करतं असताना एकाएकी त्यांनी मुलाला गोठ्यातील गाईच्या पायाशी ठेवलं आणि तिची करुणा भाकली. एमडी असलेल्या डॉक्टर कोल्ह्यांचे हे वागणं मला पटलं नाही. त्यांची ही गत तर सर्वसामान्य माणसाने गाई या पशुची विष्ठा, मूत्र तोंडाला लावल्यास दोष कोणाचा???? गाडगे बाबा यांचा वारसा सांगायचा असल्यास वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवलाच पाहिजे.
एमबीबीएस, एमडी असलेल्या व्यक्तीने समाजसेवा करण्यासाठी शेती, पशुपालन, विटभट्टी यात वेळ देणं मला मानवलं नाही. पण लोकहीतासाठी त्यांनी प्रत्यक्ष काहीतरी कृती केली याबद्दल कायम आदर आहे.
सामाजिक कामाला संस्थात्मक पाया नसेल तर शेवटी गोळबेरीज काय राहणार?
असो
2019 मध्ये डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अडचणी काय आल्या? त्यावर मात कशी केली? अनुभवाचा सल्ला काय? जीवन विषय दृष्टिकोन काय? या बाबतीत पुस्तक मार्गदर्शक ठरतं. एकवेळ जरूर वाचावं आणि जमल्यास बैरागड ला प्रत्यक्ष भेट द्यावी.
_सिद्धेश्वर
Class
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवा