मुख्य सामग्रीवर वगळा

हतबल अंधश्रद्धाळू समाज....

हतबल अंधश्रद्धाळू समाज....


नारायण सरकार हरी उर्फ भोले बाबा,या बाबाच खरं नाव सुरज पाल असून तो यूपी पोलीस मध्ये कॉन्स्टेबल होता.याच्या प्रवचनात गोंधळ उडाल्याने 121 श्रद्धाळूंचा मृत्यू झाला.(02/07/24) यात महिला, लहान मुलं यांचे प्रमाण जास्त आहे.

( रामदासी बैठक वाले धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देतानाही दिवसभर उपाशीपोटी उन्हात थांबल्याने सोळा भाविकांचा मृत्यू झाला होता. हा धर्माधिकारी निवेदन स्वीकारतो आणि लग्न करावे का नाही यावर सल्ला देतो. थोडक्यात स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवतो. याच्याकडे खरेच दैवी शक्ती होती तर होणाऱ्या भाविकांचे मृत्यूचे भाकीत का केले नाही? किती जखमींना हा इसम जावून भेटला? किती मृत भाविकांच्या कुटुंबियांना याने आर्थिक मदत केली?असो...)

बाबाने जिथे पाय ठेवला ती माती डोक्याला लावल्यास आपले आजार बरे होतात असा भक्तांचा समज होता. ती माती घेण्यासाठी गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी होऊन 121 भाविक मृत्यू पावले.

या बाबामध्ये दैवीशक्ती आहे, तो भूतबाधा दूर करतो, दुर्धर आजार बरे करतो असा प्रचार प्रसार जनतेमध्ये आहे, हा गैरसमज वाढत राहून भाविक मानसिक गुलाम व्हावेत यासाठी बाबाने विशेष प्रयत्न केलेले दिसत आहेत.

आपल्याकडे दैवी शक्ती आहेत असा या बाबाचा दावा असतो, सोळा वर्षाच्या मृत मुलीला जिवंत करण्याचा हा प्रयत्न करत होता, यासंदर्भात त्याला 2000 साली अटकही करण्यात आली होती. 

हा बाबा भक्तांना पिवळ्या रंगाचे लॉकेट देतो ज्यावर त्याचा फोटो असतो. बाबाचा सत्संग सात वेळा ऐकला की तुम्ही सेवादार होता. सेवाधाराला वेगळा ड्रेस असतो, गुलाबी रंगाचा.

( रामदासी बैठक वाल्यांना ठराविक हजेरी भरल्यानंतर घरात अनुष्ठान करण्याची परवानगी मिळते. भक्तांना आयडेंटिटी देण्याचा हा प्रयत्न असतो. भक्तांच्या या मानसिकतेचा बरोबर फायदा धर्माधिकारी व भोले बाबा यासारख्या लोकांनी उठवला आहे.)

बाबाचे बहुतांश भक्त निम्न आर्थिक स्तरातील होते, तुम्ही आज चांगले कर्म करा म्हणजे पुढील जन्म तुम्हाला चांगल्या घरात मिळेल असं तो सांगायचा.

( जीवनात येणाऱ्या असंख्य अडचणींमुळे माणस हतबल झाली आहेत. काहीजण व्यसनाचा आधार घेतात,काहीजण या बाबाबुवांचा आधार घेतात. )

👉🏻माणूस म्हणून जगायचं असेल तर भूक, रोटी, गरिबी, आजारपण,मजबुरी, लाचारी, प्रेम, कर्तव्य, त्याग, मोह,माया,लोभ,लालच,आजारी आई,दारुडा बाप, बिन लग्नाची बहीण,ऑफिस, बॉस,इन्क्रिमेंट,प्रमोशन,ट्रान्सफर,सस्पेन्शन खड्ड्यातला प्रवास, सामाजिक जबाबदाऱ्या,धार्मिक कर्मकांड,नैतिक कर्तव्य आपल्याला हव असलेलं मोठं घर, नवी कार, बायकोच्या न संपणाऱ्या मागण्या, मुलांचे शिक्षण, त्यांना हवे असलेले स्मार्टफोन, टॅबलेट, एलईडी टीव्ही आणि आपण आहोत त्यापेक्षा अधिक चांगले आहोत असे दाखविण्याची खाज अशा हजार झंझटी सोडवाव्या लागतात.(लोकसत्तातून )

कर्जबाजारी होण,आजारपण, व्यवसायात अडचणी, लग्न न जमणे, जमिनीची कोर्ट कचेरी, कौटुंबिक वाद विवाद, गरिबी या प्रश्नांना भिडणारी सर्वसामान्य जनता हतबल होऊन बाबा बुवाच्या नादी लागते. मानसिक गुलाम होऊन दैवावर भरवसा ठेवतात यातून तात्पुरता दिलासा मिळतो पण प्रश्न तसेच राहणार असतात.

_सिद्धेश्वर (040724)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...