तिसरी क्रांती, चेहरा नको व्यवस्था बदलूया!
(जातीय तणाव नष्ट करण्याचे मॉडेल सुरेश खोपडे या अधिकाऱ्याने भारताला दिले.)
अँग्री यंग मॅन पूर्ण जोशात,ऐन तारुण्यात व्यवस्था बदलायची म्हणून सरकारी नोकरीत रुजू होतो आणि कालांतराने व्यवस्थेचा भाग होऊन जातो. असं का होतं? या का चे उत्तरं या 60 पानी पुस्तकात दडलंय.
पाहिली क्रांती - भारताचे स्वातंत्र्य
दुसरी क्रांती - भारतीय राज्यघटना अमलात आली.
तिसरी क्रांती -?
भारत हा देश व समाज एक आजारी संस्था बनलेली आहे. एडवर्ड डेमिंग या विचारवंतानुसार माणसांमध्ये फक्त दहा टक्के दोष असतो. उरलेला दोष कुणामध्ये? तर 90 टक्के दोष हा तिथल्या व्यवस्थे मध्ये आहे. आपण चुकीच्या व कालबाह्य व्यवस्थेमध्ये चांगली माणसे पाठवितो त्यामुळे आपल्याला चुकीचे व कालबाह्य फायदे मिळतात.
भारतातील प्रत्येक व्यवस्था ही मूळ सामाजिक व्यवस्थेची उपव्यवस्था असते. भारतातील सामाजिक व्यवस्था कोणती? तर ती आहे वर्णव्यवस्था! भारतातील राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक,प्रशासकीय अशा सर्व व्यवस्थेत मनुस्मृती प्रभावी आहे.
मनुवाद्यांनी त्यांना पुरक असणारे धर्मग्रंथ बहुजन समाजाच्या माथी थोपवले, त्यातील कर्मकांड करणे म्हणजे संस्कृती जपणे हे शेकडो वर्ष मनावर बिंबवण्यात आलं.
पाथरवटाने दगडापासून बनवलेल्या मूर्तीत देवाला घुसवण्याचे काम हे मनुवादी करतात. यासारखा एकविसाव्या शतकातील विनोद तो कोणता?
ब्रिटिश गेल्यानंतर भारतीय राज्यघटना अमलात आली. स्वातंत्र्य समता बंधुता हे मूल्य मान्य करण्यात आले पण मनुवादातून आलेली उच्च नीच संस्कृती नष्ट झाली नव्हती.
भारतात वर्णव्यवस्थेवर आधारित समाज व्यवस्था आहे तर राज्यघटने द्वारे समतेवर आधारित समाज व्यवस्था देण्यात आली. या परस्पर विरोधी संकल्पना असल्याने या दोन विचारधारांमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. व्यवस्थापकीय त्रुटींमुळे राज्यघटनेवर आधारित समाजव्यवस्था खिळखिळी बनली आहे. तो विस्कळीतपणा नष्ट करण्यासाठी तिसऱ्या क्रांतीची गरज आहे.
भिवंडी शहरात कार्यरत असताना सुरेश खोपडे यांनी मोहल्ला कमिटी हा उपक्रम राबवला यामुळे तणावाच्या काळातही धार्मिक दंगे अजिबात झाले नाही. ते मॉडेल संपूर्ण भारतभर सातत्यपूर्ण राबवले जाव अशी त्यांची सूचना आहे. पण गेंड्याची कातडी असलेली ही व्यवस्था.......... (उत्तरं माझ्या मनात आहे,तुमचं उत्तरं?)
या पुस्तकामुळे नेमकं कशाविरुद्ध लढायचे आहे हे समजते, मार्ग भिन्न असू शकतात.
नक्की वाचा, स्नेहीजनांना भेट द्या.
_सिद्धेश्वर (010724)
💡पुस्तकातील काही उतारे
👉🏻लेखकाने मांडलेली वन (ONE )भारतीय संकल्पना - आजचा भारतीय नागरिक असा आहे.
O - (OLD) रूढी, परंपरा,संस्कृती यातून बनलेला भारतीय
N- (NEW ) ज्ञान, शहाणपण, संशोधन यातून बनलेला भारतीय
E - (ENVIRONMENT ) भोवतालचे जग, पर्यावरण यातून बनलेला भारतीय
👉🏻 जपानने 1868 साली मेजी क्रांती घडवून आणली. पाच टक्के लोकसंख्या असलेल्या उच्चवर्णीय सामुराई वर्गाचे श्रेष्ठत्व संपुष्टात आले. व त्या वर्गाने देखील सहकार्य केले. पुढे जपान महासत्ता बनला.
याउलट भारतात 1925 लाच आरएसएस ची स्थापना होऊन विशिष्ट वर्गाचं श्रेष्ठत्व अबाधित कसं राहील हे पाहण्यात आलं.
👉🏻 भारताचा स्वातंत्र्याचा लढा ब्रिटिशांविरुद्ध होता, ते सुधारणावादी होते पण दोन हजार वर्ष मनुस्मृतीच्या आधारे आपले श्रेष्ठत्व निर्माण करणाऱ्यांविरुद्ध नव्हते.
👉🏻 राजसत्ता ब्राह्मणेतर यांच्या हातात गेली तरी ते वैचारिक दृष्ट्या गुलाम वृत्तीने राज्यकारभार हाकत होते,हाकत आहेत.
👉🏻 जगभरातील सर्व संस्कृतीमधील गुलामांचे एकच ध्येय राहिले आहे, ते म्हणजे व्यक्तिगत आर्थिक स्वार्थ साधने व मिळविलेली सत्ता व संपत्ती आपल्याच घरात राहिली पाहिजे. घराणेशाही पुढे चालू ठेवणे.
👉🏻 जन्मापासून मृत्यूपर्यंतची सर्व कर्मकांडे या मनू वाद्यांच्या हातात दिल्याने सर्व समाज व्यवस्थेची सूत्रे त्यांच्या ताब्यात गेली.
👉🏻 खरा संघर्ष हा मनुवादी वर्णव्यवस्थेविरुद्ध व्हायला पाहिजे होता पण तो झाला नाही. वर्ण व्यवस्था जिवंत राहिली. पण ती गाडली,संपविली अशा भ्रमात सर्व बहुजन राहिले.
👉🏻 लोकशाहीने निर्माण केलेली गुन्हे न्यायव्यवस्था अगर आर्थिक धोरणे ही माणसाला परिपूर्ण सुरक्षितता देऊ शकत नव्हती व आताही देऊ शकत नाहीत. परंतु अशी सुरक्षितता वर्ण व्यवस्थेतून निर्माण झालेली पूर्वापर चालत आलेली जात देऊ शकते. त्यामुळे लोकशाही पेक्षा सामान्य माणसांना आपली जात जवळची वाटत होती व आताही वाटते.
👉🏻 शेकडो वर्ष चालू असलेल्या वर्ण आश्रम मनुवादाच्या तत्त्वज्ञानावर, कर्मकांडावर आधारलेली व खोलवर रुजलेली व्यवस्था उखडून टाकण्याऐवजी त्यावर आधुनिक विचारांवरील राज्यघटनेचे आवरण घातले. जुनी व नवी व्यवस्था यामधून निर्माण झालेला 'वन' भारतीय निर्माण झाला.
👉🏻 प्रगती करायची असेल तर आपल्याला सनातनी मनुवादी धर्माचे प्रस्थ माजवणाऱ्या विरुद्ध संघर्ष केलाच पाहिजे.
👉🏻 निव्वळ चांगला हेतू असल्याने आपल्याला पर्वत हलविता येत नाहीत. त्यासाठी हवी व्युहरचना म्हणजे बुलडोझर.
👉🏻 सामान्य जनतेच्या भल्यासाठी राज्यघटने द्वारे चार खांब उभे केले आहेत. लोकप्रतिनिधी प्रशासन न्यायव्यवस्था मीडिया. हे कल्याणकारी, प्रभावी व परिणामकारक प्रशासन देण्याची वेळ येते तेव्हा हे चारही खांब इतरांकडे बोट दाखवून स्वतःची सुटका करून घेतात.
👉🏻 कोणताही समाज संघर्ष विरहित नसतो. संघर्ष कधीही उफाळून येऊ शकतो म्हणून मोहल्ला कमिटी कायम चालू ठेवणे आवश्यक आहे.
👉🏻 मोहल्ला कमिटी कार्यरत असलेल्या ठिकाणी जमावाचे मानसशास्त्र बोथट बनते. जमाव एकाएकी प्रक्षुद्ध बनत नाहीत.
👉🏻 माणसाची प्रवृत्ती बदलण्यासाठी समूह चर्चा ही फार परिणामकारक पद्धत आहे.
👉🏻 मोहल्ला कमिटीच्या कामाची रचना अशा प्रकारे करण्यात आलेली आहे की आपण करतो ते काम ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे अशी प्रत्येक कर्मचाऱ्याला जाणीव होते.
👉🏻 समाजात असलेली चुकीची भीती ही समाजातील दोन गटांमध्ये भांडण होऊन वितुष्ट निर्माण होण्याचे महत्त्वाचे कारण आहे.
👉🏻 पावलो फ्रेइरे या समाज शास्त्रज्ञाने असे मान्य केलेल आहे की अधिकार हीन गटाला अधिकार दिला तर ते संघटन बळकट करतात. मोहल्ला कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे तळाचे कर्मचारी असतात, तसेच मोहल्ला कमिटीचे बरेच सदस्य हे सर्वसामान्य आणि काहीतरी उपेक्षित लोक असतात. अधिकारहिन गटाला त्यांचे आयुष्य बदलण्यासाठी साधन, संधी आणि अधिकार दिले तर खऱ्या अर्थाने ते ती संघटना मोठी करतात. ते आपला दबलेला आवाज मोकळा व मोठा करून स्वतःच्या व इतरांच्या विकासाचा विचार करू लागतात.
👉🏻 व्यवस्था बदलवायची असेल तर ती समजली पाहिजे, त्यासाठी तिचा भाग बनून आत उतरले पाहिजे.
💡 अठरापगड मावळे शिवशाही (मॉडेल )
अपमाशी मॉडेल = आमचा मोहल्ला आमचे प्रशासन / मोहल्ला कमिटी शिवशाही कमिटी
👉🏻 कार्यालयीन कामकाजाची पुनर्रचना
👉🏻 मनुष्यबळ विकास
👉🏻 नाविन्यपूर्ण योजना
💡 जपान मधील क्वालिटी सर्कल
जपान मधील प्रत्येक कंपनीतील झाडूवाल्यापासून ते कंपनीच्या प्रमुखापर्यंत काहीजण नियमितपणे एकत्र येतात. त्यांच्या या गटाला कॉलिटी सर्कल असे म्हणतात. हे सर्व लोक कंपनीच्या मालाची प्रत सुधारण्यासाठी काय उपाययोजना करावी, आपल्या वस्तूचे जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी काय करावे, कच्च्या मालात बचत कशी करावी, वस्तूची जाहिरात कशा पद्धतीने करावी की जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपली वस्तू विकत घेतील याबाबत दर बैठकीत विचार करतात. या पद्धतीमुळे जपानी मालाने जगाची बाजारपेठ काबीज केली आहे.
1)अनेक डोकी ही एका डोक्यापेक्षा नक्कीच चांगल्या प्रतीचा निर्णय घेतात.
2) घेतलेल्या निर्णयात सर्वांचा सहभाग असतो त्यामुळे सर्वजण त्याची अंमलबजावणी खुशीने करतात.
3) प्रत्येकाला वाटते की हा माझाच निर्णय आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा