देवाच्या नावानं - युनिक फिचर्स
श्रद्धाळू मााणूस मनातल्या आस्थेपोटी देवदर्शनाला जात असतो. कुठल्याश्या मंदिरात जावं, दोन-चार तास थांबावं, मनोमन प्रार्थना करावी, यथाशक्ती देणगी द्यावी आणि सुखासमाधानाच्या आशेने घरी परतावं, असा त्यांचा नित्यनेम असतो.
मात्र त्याच्या ह्या छोट्याशा कृतीमुळे देवस्थान नावाचा एक भला थोरला डोलारा उभा राहतो, याची त्याला कल्पनाही नसते.
प्रत्यक्षात त्याच्यासारख्या हजारो भक्तांच्या प्रवाहामुळे देवस्थान प्रसिद्ध पावतं, कोटी कोटीची उड्डाणं घेऊ लागतं, स्पर्धा-चढाओढ ताबा मिळण्यासाठीची धडपड अशा मानवी वृत्ती-प्रवृत्तींचा खेळ तिथे सुरू होतो. देवाच्या नावाने बरंच काही घडू लागतं. या साऱ्याचे व्यापक, सामाजिक-राजकीय परिणामही घडू लागतात.
हे सारं कसं होतं याचा महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांचा अभ्यास करून घेतलेला शोध.
_पुस्तकाचे मलपृष्ठ
शेगाव, शिर्डी, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, शनीशिंगणापूर, त्रंबकेश्वर, सिद्धिविनायक, केतकावळे, शिरगांव या ठिकाणी भेट देऊन तेथील अर्थकारण आणि स्थानिक रहिवासी यांच्या अडचणी व होणारा लाभ यावर प्रकाश टाकणारे लेख या पुस्तकात आहे.
देवळाच देवस्थान कसं होतं? त्यातील आर्थिक घडामोडी, स्थानिक नागरिकांच्या गरजा व राजकारण यावर देवस्थान चा पडणारा प्रभाव यावर अभ्यासपूर्ण मांडणी करून श्रद्धा आणि व्यवहार यात व्यवहार वरचढ ठरतो असं निरीक्षण ते नोंदवतात.
💡 देवस्थान निर्माण कसं होतं?
गावात एका सत्पुरुषाचे आगमन होतं, त्याच्या वास्तव्याने गावाचा महिमा वाढतो. पाहता पाहता श्रद्धेची परंपरा तयार होते. तिचा प्रचार प्रसार होतो. लक्षावधी लोक दर्शनासाठी लाईन लावतात. त्यांच्यासाठी सोयीसुविधा उभ्या राहतात. श्रीमंत गरीब सर्व स्तरातले लोक आपापल्या कुवतीनुसार दानधर्म करतात. त्यातून देवस्थान श्रीमंत होतं. या साऱ्या घडामोडींचा परिणाम गावावर होतो. सारं गाव कोणत्या ना कोणत्या प्रकारे देवस्थानशी जोडल जातं.
देवस्थान जागृत आहे, कडक आहे वा मनोकामना, नवस पूर्ण करणारं आहे. असा प्रचार प्रसार केला जातो. भाविकांचा ओढा वाढत कसा राहील हे पाहिलं जातं. यात बऱ्याच जणांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असतात त्यामुळे चमत्कारिक दावे करून देवस्थानचा महिमा वाढविण्याचा प्रयत्न होतं राहतो.
क्रमश :
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा