मुख्य सामग्रीवर वगळा

धर्म जात वर्ग आणि परिवर्तनाच्या दिशा -गोविंद पानसरे

धर्म जात वर्ग आणि परिवर्तनाच्या दिशा -गोविंद पानसरे (211224)



कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा खून झाला होता, तो का केला हे या पुस्तकाच्या वाचनाने समजतं.

गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव व्हावी, वर्गविहीन समाज निर्माण व्हावा यासाठी ते कार्य करत होते. ते नुसतेच विचारवंत नव्हते तर कृतिशील ही होते त्यामुळे प्रस्थापितांना, मनुवाद्यांना त्यांच्यापासून धोका वाटला. कुठलाही चान्स घ्यायला नको म्हणून त्यांची हत्या करण्यात आली.

उत्पादन साधनांची मालकी असणारा एक वर्ग आणि तिथे राबून, काबाड कष्ट करून संसाधनांची मालकी असणाऱ्याला पैसा मिळवून देणारा एक वर्ग आहे.

संसाधनांची मालकी असणारा मुठभर वर्ग स्वतः श्रम करत नाही. आयतं खाणारा हा वर्ग अतिरिक्त पैशाच्या जोरावर देशाची धोरणं ठरवू लागतो. यात सामान्य जनतेचे हित नसते.( भारतीय सैन्य दलासाठी आणलेली अग्नीवर योजना आठवा.)

आहे त्या व्यवस्थेत सामाजिक न्याय मागणं म्हणजे या व्यवस्थेचे(भांडवलशाही चे ) मरण पुढे ढकलणं आहे, समाज बदलाची मागणी व्हायला पाहिजे, त्यासाठी क्रांती, संघर्ष अपरिहार्य आहे. भांडवलदार वर्ग नष्ट व्हावा हे कम्युनिस्टंना अपेक्षित आहे.

समजा 

आपण गृहीत धरू कॉम्रेड पानसरे यांना अपेक्षित असलेला वर्ग विहीन समाज अस्तित्वात आलाय 
मग काही प्रश्न 

👉🏻 उत्पादन संसाधनांची मालकी सरकारची राहीली तर कार्यक्षमता वाढते का?

👉🏻 कारखानदारी सरकारी नोकरशाहीच्या अधिपत्याखाली आली तर दर्जात्मक फरक पडत नाही का?
एअर इंडिया,बीएसएनएल, महावितरण च काय झालं?

👉🏻 नोकरशाही बलवान होऊन उद्यमशीलता मारली जाणार नाही का?

👉🏻 खाजगी उद्योगांना नाकारून संधीची समानता या भारतीय राज्यघटनेतील तत्त्वाला बाधा येणार नाही का?

👉🏻चीन, रशिया, क्युबा अपयशी का ठरले? चीन ने तर साम्यवाद कधीच सोडून दिलाय असं का?

वर्गवीहीन समाज अस्तित्वात येणं हे मृगजळ आहे. कधीही प्रत्यक्षात येऊ न शकणार स्वप्न, कल्पना आहे.

मग आपण करावं तरी काय?

आपण सामान्य जनतेचे प्रबोधन करत राहिले पाहिजे. भांडवलदारांचा एक वर्ग असतो, ते एकत्र येऊन त्यांच्या हिताची धोरणं ठरवतात.ती अंमलात आणावीत यासाठी सरकारवर दबाव आणतात.
( भारतात कॉर्पोरेट टॅक्स 30 वरून 22 टक्क्यांवर आणला आहे. मागील दहा वर्षात बारा लाख कोटी रुपये कर्ज उद्योगपतींना माफ केल आहे.) 
सामान्य जनतेला देश, धर्म, राष्ट्रवाद,जात, यात गुंतवून ठेवलं जातं. 

आपले सगळे प्रश्न आर्थिक आहेत याची जाणीव बहुजनांना करून देणे हीच कॉम्रेड गोविंद पानसरे यांना श्रद्धांजली ठरेल.

(बहुजन कोण?
ज्याच्याकडे विद्याबळ, द्रव्यबळ,अधिकारबळ नाही तो इसम, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो तो बहुजन आहे.)

 _सिद्धेश्वर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...