मुख्य सामग्रीवर वगळा

बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर -भाऊ पाध्ये

बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर -भाऊ पाध्ये (010925)



सुखवास्तु कुटुंबातील असल्याने आर्थिक गरजा विनसायास भागल्या कि निवांत वेळ भेटतो.
विचारी मनासाठी हा निवांत वेळ अस्वस्थेच कारण ठरतो. 

जीवनाचा अर्थ काय? उद्देश काय? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत. ही यातायात, उठाठेव कशासाठी हा प्रश्न वारंवार पडतो. त्यातून एक बैचैनी, अस्वस्थता येते.
(हीन मनोरंजनात भान हरपून जगण्यापेक्षा ही बैचैनी ठीक आहे. - वैयक्तिक मत)

वडिलांकडून वकिलीचा वारसा असलेला बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर हा विदेशात वकिलीचं शिक्षण घेऊन आला आहे. उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत असताना त्याला जीवनाविषयी निराशा येते.
सुस्वरूप पत्नी प्रियवंदा आणि तीच नकली वागणं, वैचारिक मतभेद या सर्वांचा त्याला उबग येतो.

इथून कथानक सुरु होतं.... 

आयव्ही, क्लारा, रायसाहेब आणि अनिरुद्ध चित्रपट पाहायला जातात. आयव्ही च्या बाबतीत अन्याय होतो. तिला मदत म्हणून अनिरुद्ध सर्व काही सोडून दूरच्या खेड्यात मित्र चक्रपाणी याच्या घरी राहवयास जातो.

आयव्ही च पुढं काय होतं?
अनिरुद्ध आणि प्रियवंदा यांच्या पैकी कोणाचा जीवनविषयक दृष्टिकोन योग्य आहे?
अनिरुद्ध ने इतकं टोकाचं पाऊल घ्यायला नको होतं ना.... 

अनुत्तरीत राहणारे प्रश्न निर्माण करून, अस्वस्थ करणारी ही कादंबरी वाचली पाहिजे.

Everything is meaningless and Life is random इतपर्यंतचा विचार देऊन ही कादंबरी संपते. याच्या पुढचा टप्पा अल्बेर कामुने द मिथ ऑफ सिसिफ़स मध्ये आधीच सांगितला आहे. तो असा......

ONE MUST IMAGINE SISYPHUS HAPPY 

_ सिद्धेश्वर

💡पुस्तकातील उतारे

👉🏻माणसानं उगीच कशाला मोठं व्हायचं? मोठं झालं म्हणजे आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ प्राप्त होतो, असंच ना? आपले मानसन्मान व्हावेत, पुतळे उभारावेत, रस्त्यांना आपली नावं द्यावीत, थोडक्यात जगाला आपल्या अस्तित्वाची मुद्दाम जाणीव करून द्यावी, हे कोणी सांगितलंय?... आणि जगाला तरी तुमच्याविषयी इतका इंटरेस्ट कुठे असतो?

👉🏻कुणाच्याही मृत्यूविषयी काय बोलावं, हेच समजत नाही. दुःख करणंही समजत नाही. लोक आपल्या घरचं माणूस गेल्यावर पराकाष्ठेचे दुःखी होतात. आक्रोश करतात. ते दृश्य पाहून मी केवळ थिजून जातो. इतकी का माणूस ही भरवसा देण्यासारखी गोष्ट आहे?

पण, मी बोलत नाही. माणसाच्या निष्प्राण कलेवराला पाहून मी गाभ्यापासून हादरलेला असतो. एखादं प्रेत पाहता पाहता, मला वाटू लागतं, मीही त्याच जागी आहे. अशीच कळाहीन त्वचा. असाच गारठलेला देह. असेच पांढरे कवड्या झालेले डोळे. त्या वेळी माझं मलाच भय वाटतं. आपण संपणार हे असेच. ही जाणीव इतकी भेसूर वाटते, की मी सुन्न होतो.

प्रत्येक माणसाचं प्रेत मला असंच उद्ध्वस्त करत आलं आहे. 'मी कोण आहे?... हे शरीर मी का पांघरलं आहे? हे पांघरूण निघाल्यावर मी कुठे जाणार?' या प्रश्नांची उत्तरं गूढ आहेत. उत्तरं जुळवत राहणं म्हणजे निव्वळ भंपकपणा आहे.

मृत्यू अटळ आहे, ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे; परंतु मला ती जास्त माहीत आहे. आयुष्यातल्या कोठल्याही क्षणी मी त्याला नजरेआड करू शकत नाही. जणू, मला मिळालेला तो एक शापच. म्हणूनच मी माझ्या आयुष्याचा अर्थ शोधत बसलो नाही किंवा कोठच्यातरी उदात्त कल्पनेच्या कैफात स्वतःला हरवून बसलो नाही. सुख-दुःख, राग लोभ, फार काय, या कलेवराचा सचेतन स्थितीत होणारा दुसऱ्या सचेतन कलेवराशी समागम, हे सारंच ओंगळ आहे. अर्थशून्य आहे. निश्चेतन शरीराला समागम ठाऊक आहे काय? त्याला सुखसंवेदना ठाऊक आहेत काय? साराच अंधार ! सारंच शून्य पण तरीसुद्धा कधीतरी एक प्रश्न एकदमच उफाळून वर येतो. 'आयव्ही कुठे असेल आता?' तिची गैरहजेरीच फार जाणवते. वाटतं ती त्या पांगळ्या जनार्दनबरोबर बुद्धिबळाचा डाव खेळत असेल किंवा चक्रपाणिवहिनीला गहू निवडून देत असेल; पण या आठवणी काढण्यात आता स्वारस्य आहे काय? माझ्यापेक्षा डोक्यानं अधू असलेला तो जनार्दन बरा. त्याला वहिनी म्हणाली,

'जनार्दनभाओजी, तुझी आयव्ही गेली रे!'

'जाऊ दे. ती फुलं आणायची तीपण सुकायची. तिचा डाव उजव्या हातानं खेळता येईल आणि माझा डाव डाव्या हातानं खेळता येईल.'
आणि तो खदाखदा हसू लागला. हसता हसता बिछान्यावर लोळू लागला. मग, गंभीर होऊन पटाकडे पाहत, त्यानं खमीसाच्या कडेनं डोळे पुसले. डोक्यानं अधू असलेला जनार्दन.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...