संत आणि सायन्स - प्रा मा का देशपांडे (120325)
या पुस्तकाची पाहिली आवृत्ती 1970 साली आली. दुसरी 2003 ला.लेखक व्यासंगी वाचक होते. संत साहित्याचा व पाश्चात्त्य विचारवंतांचा, लेखकांचा त्यांचा अभ्यास व दिलेले दाखले पाहून अचंबित व्हायला होतं.
वारकरी संप्रदाय व संत विचाराकडे यादृष्टीने कधी ही पाहिलं नव्हतं. या पुस्तकामुळं बालपणापासून झालेल्या कंडिशनिंग चीं एक एक पुटं बाजूला होतं जातात.
मी पूर्णपणे निरीश्वरवादी/ मानवतावादी झालो असं आता स्वतःशी कबूल करतो. जे सत्य माझ्या मनी उमललंय त्याला अनुसरून जीवन जगायचं धैर्य मिळवत राहायचं.
जगात, आकाशात देव नाही त्यामुळे पूजा अर्चा, कर्मकांड करणे हा बालमनाचा विरंगुळा आहे तो आपण करायचा नाही.
आकाश ही न संपणारी निर्वात पोकळी आहे. कुठेही स्वर्ग नर्क नाही. वर्तमान क्षण पूर्ण भान ठेऊन आनंदात वा समस्थितीत जगणं हाच त्या क्षणाला दिलेला न्याय आहे.
आपला समाज विकसित होईल, दिन दुबळ्यांचे दुःख कमी होईल, अज्ञानामुळे कोणाचेही शोषण होणार नाही यासाठी यथाशक्ती वेळ, पैसा, बुद्धी खर्च करणे यातच जीवनाची इतिकर्तव्यता आहे.
(जीवांची सेवा हीच ईश्वर सेवा - स्वामी विवेकानंद/ वेदांत विचार )
प्रस्तुत लेखक आज हयात नाहीत. त्यांनी हे पुस्तक लिहून रुजवलेला विचार हळूहळू का होईना वृद्धिंगत होतं राहील हा विश्वास आहे.
या विचारांचा पाईक व प्रसारक होण्याचा संकल्प करून प्रा मा का देशपांडे यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो.
(आपल्या धारणा आणि श्रद्धा याचीं चिकिस्या करण्यासाठी हे पुस्तक वाचायची इच्छा आणि फुरसत सर्वांनी मिळावी...... आशा व्यक्त करण्याशिवाय काय करू शकतो ? )
_ सिद्धेश्वर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा