मुख्य सामग्रीवर वगळा

मानव विजय - शरद बेडेकरधर्म ईश्वर चिकित्सेकडून निरीश्वरवादाकडे

मानव विजय - शरद बेडेकर
धर्म ईश्वर चिकित्सेकडून निरीश्वरवादाकडे  (050325)


मनातील पूर्वग्रह, लहानपणापासून झालेली कंडिशनिंग बाजूला सारून शरद बेडेकर लिखित मानव विजय पुस्तक वाचल्यास जीवनात क्रांती होईल.
आपल्या मध्ये आत्मा आहे, तो परमात्म्याचा अंश आहे. मोक्ष मिळवण म्हणजे जन्म मृत्यू च्या चक्रातून मुक्त होऊन परमात्म्यात विलीन होणं आहे. असा भडीमार लहानपणापासून आपल्यावर होतं आला आहे. 

हत्तीच्या लहान पिल्लाला साखळदंडांनी बांधून ठेवलं जातं, त्याचं कंडिशनिंग होतं की ही साखळी आपण तोडू शकत नाही. तो हत्ती मोठा होऊन देखील त्याच मानसिक गुलामगिरीत, साखळदंडाने बांधलेले पाय या अवस्थेत जगतो. 

मृत्यू नंतर काय या विचाराने माणूस निराश, हतबल होऊ नये म्हणून मोक्ष, पुनर्जन्म ही कल्पना आली. मृत्यू नंतरच्या जीवनाची आस बाळगून नानाविध कर्मकांड, विधी करायला सांगितले जातात. 

मानवी जीवनात अन्याय, दुःख, पीडा का आहे? यावर सोपं उत्तर पूर्वजन्मच पाप वा संचित असं सांगितलं जातं.
ख्रिश्चन मुस्लिम या धर्मात पुनर्जन्माची कल्पना नाही, तिथे मानवी जीवनातील व्यथांना सैतान वा इब्लीस कारणीभूत असतो अशी कल्पना मांडण्यात आली आहे.

महात्मा फुले यांनी निर्मिकाची कल्पना मांडली. निर्मिक आहे पण आपण त्याची पूजा, स्तुती केल्याने वा ना केल्याने आपल्यावर नाराज व्हायला तो काही तुमच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी नाही.
नारायण नागबळी, पिंडदान, सत्यनारायण, अथर्वशीर्ष चे सामूहिक पठण, हरीनाम सप्ताह केल्याने, कोणत्याही मठात जाऊन नवस केल्याने वा न केल्याने निर्मिक ला काहिही फरक पडतं नाही.
परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप हे सूत्र मनाशी ठेऊन आपलं दैनंदिन जीवन अधिक सुखकर व आनंदी करणं हीच खरं निर्मिकाची भक्ती आहे. त्यासाठी कुठल्याही मंदिरात, मठात, तीर्थक्षेत्री जाण्याची आवश्यकता नाही.

मनुष्य जन्म एकदाच आहे. वेळ मौल्यवान आहे.निर्मिक असला तरी पुनर्जन्म, आत्मा, परमात्मा, दैवी कृपा/ अवकृपा असं काही नसतं. स्व कर्तृतवावर विश्वास ठेऊन जीवनातील संघर्षाला सामोरे जायच.

(श्याम मानव, नरेंद्र दाभोळकर, प्रा य ना वालावलकर, रिचर्ड डॉकिन्स, सुनील दांडेकर आणि अ हा साळुंखे यांची पुस्तके सुद्धा वाचावीत.)

_ सिद्धेश्वर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...