मुख्य सामग्रीवर वगळा

गोपाळांची पोरं - अनिल शिणगारे

गोपाळांची पोरं - अनिल शिणगारे (240525)



"मला माझा शिक्षकी पेशा खूप आवडतो. कारण थेट जिवंत माणसांशी माझा संबंध येतो. त्यांना माझ्याकडून चांगलेच मिळाले पाहिजे असा माझा प्रयत्न असतो. भविष्यात माझ्या एखाद्याही विद्यार्थ्याने या शिक्षकाने माझे नुकसान केले असे म्हटले नसले पाहिजे असा माझा प्रयत्न असतो "

- अनिल शिणगारे


शिक्षण असमान असताना भारतात जगात समानता कशी येईल? सर्वांना शिक्षणाच्या समान संधी असणं, सुरक्षित बालपण मिळणं हे जग सुंदर बनवण्याच्या प्रक्रियेतील पायाभूत घटक आहेत.

माणसं जन्माची कैदी असतात. काही अभागी जीवांच्या वाट्याला उपासमार, हेटाळणी, असुरक्षितता येते. घरातील अशा असुरक्षित वातावरणामुळे बालमनं करपून जातात. वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून बालमजुरी त्यांच्या वाट्याला येते. घरात पोषक वातावरण नाही त्यामुळे शिक्षणाविषयी तिटकारा निर्माण होतो.

वारणा पासून सात-आठ किलोमीटर दूर असलेल्या खेडेगावात अनिल शिणगारे या गुरुजींची बदली होते. शाळेची अवस्था सुधारून हजेरी मध्ये सातत्य रहावे यासाठी ते काय संघर्ष करतात? किती कष्ट घेतात याचा संक्षिप्त आढावा या पुस्तकात घेतला आहे.

समाजात असणार भयान वास्तव संवेदनशील मनाला अस्वस्थ करत. अस्वस्थ होऊन हतबल न होता परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे याची जाणीव अनिल शिणगारे यांच्यासारख्या गुरुजींमुळे होते.

गोपाळ - रामोशी यांची मुलं नियमित शाळेत यावीत म्हणून चौकटी बाहेर जाऊन प्रयत्न करणारे, खस्ता खाणारे, आर्थिक तोशिश सहन करणारे अनिल शिणगारे यांच्यासारखे ज्ञात अज्ञात नागरिक, शिक्षक मनाला दिलसा चेतना देऊन जातात.

हातावर पोटं असणाऱ्या भटक्या विमुक्त समाजाला त्यांचं भलं कशात आहे हे समजत नाही,पालाच्या खोपटात राहतात पण घरात टीव्ही आहे. टीव्हीसाठी बॅटरी काळजीने चार्जिंग करून आणली जाते.त्या टीव्ही मुळे मुलं शाळेत येत नाहीत. काबाड कष्ट करून चांगल जेवण करायच तर दारू पितात. 6-7 वर्षाच्या मुलांना शाळेत पाठवायचं तर शेतात मजुरी ला नेतात. माणसांचा विवेक इतका रसातळाला कसा जात असेल?
तरीही गुरुजी प्रयत्न करत राहतात.

शिक्षणातील भ्रष्टाचार कधीच भरून काढता येत नाही याची जाणीव ठेवून कृती करणारे शिक्षक असावेत....

गुरुजी हे नामाभिमान सार्थकी लावणारे, गुरुजी कसा असावा याची जाणीव निर्माण करणारे हे अनुभव कथन प्रत्येक शाळेतील "सरांनी" "मॅडम" नी वाचलं पाहिजे. कदाचित ही सुरुवात ठरेल "गुरुजी " होण्याच्या प्रवासाची.....

_ सिद्धेश्वर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...