द लायब्ररी - झोरान झिवकोविच (नितीन रिंढे ( वॉल्डन प्रकाशन ) (200625)
"पुस्तकं" हे मुख्य पात्र असणाऱ्या या काल्पनिक, जादुई कथासंग्रहात 7 कथा आहेत. या कथा पुस्तकाकडे, वाचनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देतात,वाचकाला आनंद देतात.
नितीन रिंढे यांनी केलेला अनुवाद उत्तम आहे.
💡आभासी ग्रंथालय
लेखक निवांतपणे आलेले ईमेल तपासत होता. ऐक जादुई ई-मेल त्याचे भविष्य सांगतो. लेखक किती पुस्तके लिहिणार आणि त्याचा मृत्यू कधी होणार याचे अंदाज त्यात असतात. पुढं काय होतं.......?
👉🏻 दुर्दैवाने विवेकी आवाज नेहमीच कोणी गांभीर्याने घेत नाही.
💡घरातलं ग्रंथालय
आलेली बिलं तपासण्यासाठी तो पत्र पेटी उघडतो तर जागतिक साहित्यावरील ऐक पुस्तक त्यात असते. पुस्तकं बाहेर काढून पत्रपेटी साफ करून बंद करतो. काही क्षणानी पुन्हा पत्र पेटी उघडतो तर आणखी ऐक पुस्तक पत्र पेटीत आले ले असते. ही किमया रात्रभर सुरु राहते. पुस्तकं ठेवण्यासाठी सर्व घर रिकामं करतो. कारण 8305 पुस्तकं पत्र पेटीतून मिळालेली असतात.
दुसऱ्या दिवशी कामाला जाण्यापूर्वी तो पुन्हा पत्र पेटी साफ करतो आणि.......
👉🏻 मला फार आधीच साक्षात्कार झालाय की हे जग अनाकलनीय आश्चर्यांनी भरलेल आहे. अशा गोष्टींचे स्पष्टीकरण करू पाहणं ही निरर्थक आहे .
👉🏻 स्पष्टीकरणाच्या चाकोरीत न बसणाऱ्या गोष्टी आहेत तशा स्वीकाराव्यात, कोणत्याही खुलाशा शिवाय. त्यांच्यासह जगण्याचा हाच सर्वात सोपा मार्ग आहे.
👉🏻 एक साधासा निर्णय झटक्यात तुम्हाला नवा जन्म देऊ शकतो हे अद्भुत आहे.
👉🏻 आत्मतुष्टता ही हीन अभिरुचीचीच निदर्शक असते, विशेषतः तिचा दिखावा करणं.
👉🏻 घाईन काहीतरी निष्कर्ष काढण्याची लोकांना सवयच असते.
👉🏻आणि पुस्तकं अधाशासारखी जागा गिळतात ही वस्तुस्थिती तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. तुम्ही हा नियम बदलू शकत नाही. तुम्ही कितीही जागा द्या, त्यांना ती पुरणार नाही. प्रथम ते भिंती व्यापतील. नंतर जिथं कुठं पाय टाकता येईल तिथं तिथं पसरत जातील. पुस्तकांच्या अतिक्रमणापासून फक्त छतांना सूट मिळते. नवी पुस्तकं येत राहतात अन् एखाद्याही जुन्या पुस्तकापासून स्वतःची सुटका करून घेणं तुम्हाला सहन होत नसतं. कोणाच्या लक्षातही येणार नाही अशा प्रकारे संथपणे पुस्तकं हिमनदीसारखी वाटेत येणाऱ्या प्रत्येक वस्तूला पुढं पुढं ढकलत त्यांची जागा व्यापत जातात.
💡रात्र ग्रंथालय
शनिवार रविवार ची सुट्टी कारणी लावायची म्हणून तो पुस्तकं बदलण्यासाठी उतावीळ असतो. रात्री 8 वाजता ग्रंथालय बंद होतं. तो काहीसा उशिरा च ग्रंथालयात प्रवेश करतो आणी दार, लाईट बंद होतात.
तिथे अवतरतो रात्र पाळीतील ग्रंथपाल... तिथे असतात जीवनाची पुस्तके..."तो" त्याच्या जीवनाचं पुस्तकं घेतो आणि.......
👉🏻 माझ्या ध्यानी आलय की टीव्ही समोर बसून मेंदू बधिर करून घेण्यापेक्षा वाचन करणे अधिक फलदायी आणि आनंददायी आहे.
👉🏻 खरी खरी आयुष्य कल्पनेने रचलेल्या जीवन कहाण्यांपेक्षा नेहमीच अधिक चित्त वेधक असतात.
💡नरकातलं ग्रंथालय
तो ऐक गुन्हेगार होता. मागील 28 वर्षात त्याने वाचनासाठी केवळ दोन पुस्तके हातात घेतली होती, ती ही पूर्ण वाचली नाहीत. मृत्यू झाल्यानंतर तो नरकात जातो. त्याच्या जीवनाचा लेखाजोखा पाहुण त्याला शिक्षा फर्मावली जाते....
अनंत काळ फक्त आणि फक्त वाचन करण्याची.
👉🏻 आणि शेवटी वाचनापासून मिळणाऱ्या समाधानाची इतर कशाशीही तुलना होऊ शकत नाही याची तुला प्रचिती येईल. अनंत काळाच्या प्रवासात प्रत्येकाला याची जाणीव होतेच, काहींना लवकर होते,काहींना उशिरा.
💡लघुत्तम ग्रंथालय
तो लेखक असला तरी काय लिहावं हे सुचत नसतं. पुस्तकं खरेदीला तो बाजारात जातो.
" तुला जे हवंय ते माझ्याकडे आहे " असं म्हणत ऐक अंध वृद्ध व्यक्ती त्याला बोलावतो. त्याच्या हातात ऐक कोरं पुस्तकं देतो.
ते जादुई पुस्तकं असते.
लेखक लिहायला बसतो.... आता त्याचं काम कधीही संपणार नसतं.
👉🏻 लेखक म्हटलं की स्वाभाविकच कठोर मेहनतीला पर्याय नाही. आता विश्रांती नाही आणि कष्टाचा मार्ग टाळण्याच्या आठ रस्ते ही नाही. वेदना हा लेखककीय अनुभवाचा अविभाज्य घटक आहे. म्हणूनच हे कष्टाचं काम संपल्यावर मिळणारे सुखही सर्वश्रेष्ठ असतं.
💡घरंदाज ग्रंथालय
पुस्तकांच्या दर्जाबाबत तो कसलीही तडजोड करायला तयार नसतो.कागदी बांधणीच (पेपरबॅक)पुस्तकं संग्रहात पाहून त्याला शिसारी येते.
कागदी बांधणीच ते पुस्तक तो कचऱ्यात टाकतो, पण ते पुन्हा मूळ जाग्यावर आपोआप येते. ते पुस्तक नष्ट करण्यासाठी तो बरेच जालीम उपाय करतो पण निरूपाय होतो.
अखेरीस त्याला यश येते.
👉🏻घरंदाज ग्रंथालयात फक्त योग्य आणि समर्पक ठरतील अशा गोष्टींनाच प्रवेश मिळाला पाहिजे. पात्रता नसताना एखाद्या पुस्तकाने अशा जागी प्रवेश मिळवला, तर खाण्यालायक नसलेली वस्तू बेफिकीरपणे गिळल्यासारखं होईल. तुम्हाला किळस येऊन मळमळायला लागेल.
👉🏻केवळ अज्ञानी आणि अर्धवट माहिती असलेले लोकच मुखपृष्ठावरून पुस्तकाचा दर्जा ठरवू नये असं म्हणू शकतात. एखादी थोर कलाकृती, तिचं आवरण कसंही असलं तरी थोरच असते असं सकृत्दर्शनी वाटलं, तरी तसं समजणं अत्यंत मूर्खपणाचं आहे.
👉🏻खरं तर कागदी बांधणीची पुस्तकं तयार करणारे लोकच विवेकशून्य असतात. त्यांना कसल्याही शुचितेशी काही देणंघेणं नसतं. भरपूर नफा होण्याची खात्री असेल तर फालतू गोष्टींसाठी अतिशय उदात्त शब्द वापरायला त्या अजिबात कचरणार नाहीत. त्यांना काय फक्त पैसा दिसतो. अशा पद्धतीने गांभीर्य,दर्जा घालवणार गैर वागणं आपल्याला शेवटी कुठे घेऊन जाईल असा मला प्रश्न पडतो.
👉🏻 काहीही होवो, माणसाला स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवता आला पाहिजे. आपल्या नेनिवेतल्या उर्मिनां लगाम घालू शकलो नाही तर ते आपल्याला कुठे नेऊन ठेवतील?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा