मुख्य सामग्रीवर वगळा

हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त - संपादक - वि गो खोबरेकर

हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त - संपादक - वि गो खोबरेकर (250225)



प्रकाशक - साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र राज्य 

ऑक्टोबर १८९७ मध्ये दामोदर हरी चाफेकर यांनी हे आत्मवृत्त मोडी भाषेत लिहून ठेवले होते. त्याचा मराठीत अनुवाद श्री खोबरेकर यांनी केला.



22 जून 1897 दामोदर हरी चाफेकर आणि त्यांचे बंधू बाळकृष्ण हरी चाफेकर यांनी ब्रिटिश अधिकारी रॅंडचा खून केला.
दामोदर हरी चाफेकर यांना 18 एप्रिल 1898 रोजी येरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आले.

दामोदर आणि बाळकृष्ण या दोघांचे लग्न झाल होत. रँडच्या खुनाच्या वेळी दामोदर यांना एक मुलगा आणि बाळकृष्ण यांना एक मुलगी होती.

दामोदर यांना अटक होताच त्यांचे बंधू बाळकृष्ण पळून गेले. आणि बैराग्याच्या वेशात राहून मंत्र तंत्र ने उपचार बरे करणे हा उद्योग करू लागले. त्यांचा संशय आल्याने त्यांना पकडण्यात आले आणि ओळख पटवून 12 मे 1899 रोजी फाशी दिले.

दामोदर व बाळकृष्ण यांची बातमी देणाऱ्यास ब्रिटिशांनी वीस हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. या अमिषास भुलून द्रविड बंधूंनी ब्रिटिशांना माहिती दिली. यामुळे चाफेकरांचा तिसरा बंधू वासुदेव हरी चाफेकर यांनी आपटे या मित्राच्या साहाय्याने द्रविड बंधूंना गोळ्या घातल्या.

ब्रिटिश सरकारने वासुदेव हरी चाफेकर व आपटे यांना 8 मे 1899 रोजी फाशी दिली.

22 जुन 1897 रँड खुन 
18 एप्रिल 1898 दामोदर यांना फाशी (27)
8 मे 1899 वासुदेव यांना फाशी(वय 18)
12 मे 1899 बाळकृष्ण यांना फाशी (24)                               

💡चाफेकरांविषयी 

चाफेकर बंधूंचे वडील कीर्तनकार होते. वडिलांबरोबर दामोदर, बाळकृष्ण कीर्तनाला जात. दामोदर 15 वर्षाच्या असताना ते वडिलांबरोबर रायपूरला कीर्तनासाठी गेले होते. तेथील घनदाट अरण्याचा प्रदेश पाहून दोघे भाऊ प्रचंड प्रभावित झाले. काहीतरी भयंकर कृत्य करून आश्रय घ्यायला ही जागा किती छान आहे, असा विचार त्यांच्या मनात आला.

काहीतरी अचाट कृत्य करावे या विचाराने हे दोघे बंधू भारावून गेले होते त्यासाठी ते बलोपासना मन लावून करत. दररोज पहाटे पाच वाजता उठून 11 मैल धावणं, 1200 सूर्यनमस्कार करणं हा त्यांचा छंद होता.

कोल्हापूरला जाऊन तालीम करण्याची त्यांची फार हौस होती. तिथला खर्च किमान वर्षभरासाठी करावा यासाठी त्यांनी बापूसाहेब कुरुंदवाडकर यांना पत्र लिहिले होते पण या बंधूंची विनंती फेटाळण्यात आली.

युद्ध कला शिकण्यासाठी नेपाळला जाण्याची सुद्धा तयारी चाफेकर बंधूंनी केली होती. पण ते होऊ शकलं नाही.

धर्माला जी कृत्ये मान्य नाहीत ती करायची नाही असा त्यांचा निश्चय होता. धार्मिक कार्यासाठी लागणारी कोणती वस्तू चोरून घेतल्यास दोष लागत नाही असा त्यांचा विश्वास होता. चाफेकर बंधूंना त्यांच्या कुळाचा फार अभिमान होता.

क्रिकेट खेळणाऱ्या लहान मुलांमध्ये त्यांनी स्वधर्म जागवला आणि त्यांना अंकित करून संघटित केले. त्यांच्या मनात क्रिकेट विषयी तीटकारा निर्माण करून गोफन चालवण्यास शिकवले. कुस्ती,दांडपट्टा, उंच उड्या, मूष्टीयुद्ध हे खेळ मुलांना शिकवले. चाफेकर बंधूना क्रिकेट खेळाची फार किळस होती. क्रिकेट खेळणाऱ्याचे सामान ते चोरून नेत असतं.

पर्वतीच्या पायथ्याशी त्यांनी गोफण्या मारुतीचे मंदिर स्थापन केले.
"नुसते बोलू नका तर काहीतरी करून दाखवा " हे चाफेकर बंधूंचे ब्रीद होतं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...