ठगाची जबानी - मेडोज टेलर (प्रा. वा. शी. आपटे )
भारतात 36 वर्षे ब्रिटिश अधिकारी म्हणून काम करताना मेडोज टेलर याला ठगांबद्दल जे अनुभव आले त्याला कादंबरी स्वरूप देऊन "ठगाची जबानी" लिहिले आहे.
पूर्वी प्रवास करायचा म्हणजे दिव्य होतं. घोडा, तट्टू, बैलगाडी, पायी असा प्रवास केला जायचा. तो प्रवास काही दिवस, आठवडे, महिने चालायचा. दूरच्या प्रदेशात, निबीड अरण्यात, अनोळखी लोकात - मुलखात प्रवस करणं धोकादायक होतं. चोर, लुटारू, ठग, दरोडेखोर यांची भीती असायची.
सावज हेरून त्यांच्याबरोबर प्रवासाला सुरुवात करायची, त्यांचा पूर्ण विश्वास संपादित करायचा आणि बेसावध क्षणी परवलीचा शब्द उच्चारून सर्वाना फास लावायचा, नंतर कपड्यांनीशी सर्व ऐवज घ्यायचा आणि प्रेतांची पोटं फाडून ती गाडायची ही ठगांची कार्यप्रणाली होती.
ही देवीने दिलेली जबाबदारी आहे अशी ठगांची श्रद्धा होती. महिला, लहान मुलं कोणालाही ते दया दाखवत नव्हते.
अमर अली हा ठग त्याचा जीवनावृत्तांत या कादंबरीतून सांगतो. विधिनिषेध न पाळणाऱ्या या ठगांना काही प्रमाणात संस्थानीकांची ही साथ होती, लुटीतील काही वाटा त्यांना मिळायचा.
जय काली, लगावं पान, भिलामांजे (खड्डे खणून झाले ) यासारखे त्यांचे परवलीचे शब्द होते हे उच्चारले की निमिषार्धात त्यांच्या रुमालाचा विळखा प्रवाशाच्या मानेस पडून त्याला फास दिला जायचा.
ठग आणि पेंढारी यांची वृत्ती पाहिली की वाटतं बरं झालं ब्रिटिश भारतात आले. त्यांनी कायद्याचं राज्य आणलं, ठग आणि पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केला.
(समकालीन जीवनाची कल्पना येण्यासाठी एकवेळ जरूर वाचावी "ठगाची जबानी ")
💡पुस्तकातील उतारे
👉🏻वरून साजरे दिसावे पण थापा मारून लोकांना फसवावे, काहीही सोंग घेतले तरी ते शेवटपर्यंत निभावून न्यावे. भाषण गोड असावे. अंगी लीनता असावी. वागण्यात चपळपणा असावा तरच सोद्याचे काम जमते. आमच्यातला बद्रीनाथ एक उत्तम सोदा होता. तो म्हणे, ‘ज्या कुणावर माझी नजर गेली, व ज्या कुणाला मी गंडवायचे असे ठरवीन, तो माझ्या हातून निसटला असे कधी घडलेच नाही.’
👉🏻स्त्री-सौंदर्याच्या आहारी जाऊन आजपर्यंत कित्येकांनी आपली कर्तबगारी अशीच फुकट घालवली आहे. या स्त्रिया दिसतात तशा नसतात !’
👉🏻बुनीज म्हणजे ज्याला आम्ही ठगीने मारला त्याचे भूत.
👉🏻अशा प्रकारे ‘वध’ करणार्या खुन्याचे, मारेकर्याचे मन त्याला नेहमी खात राहातं. त्याची मन:शांती ढळून जाते. ती व्यक्ती केव्हा ना केव्हा आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप करते. पण या ठगांचे काही वेगळेच आहे. त्यांना या मनुष्य हत्येचं कधी वाईट वाटत नाही.
👉🏻एकारी म्हणजे लांडगे किंवा कोल्हे विशिष्ट आवाजात अशुभ वाटेल अशा स्वरात रडतो त्याला एकारी म्हणतात.
👉🏻पुन्हा एकदा ससा माझ्या पायाजवळून आडवा गेला. अपशकून होता. तरी तो मानला नाही. माझे बनिज माझ्या पक्के हाती होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा