मुख्य सामग्रीवर वगळा

तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ - नरेंद्र चपळगावकर

तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ - नरेंद्र चपळगावकर (171025)



चंद्रचूड, गोगई यांच्यासारखे 'जज' पाहिले की न्यायमूर्ती हा शब्द मागे पडला याचं बरं वाटतं.

न्यायमूर्ती या शब्दात किती आदर वाटतो, आहे. या शब्दाला साजेसं काम करणारे महानुभाव
पूर्वी होऊन गेलेत. भारत ही संकल्पना तयार होण्यात ज्यांनी देह झीजवला, खस्ता खाल्या, ससेहोलपट भोगली, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, आर्थिक त्याग सोसला त्यांच्या शिकवणुकीच विस्मरण आजच्या समाजाला झालंय का?

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती काशिनाथ त्रिंबक तेलंग, न्यायमूर्ती नारायण गणेश चंदावरकर यांच्या कार्याची ओळख या पुस्तकातून करून दिली आहे.

ब्रिटिश शासनाच्या नोकरीतील सर्वोच्च पद म्हणजे उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक होणे होय. पहिले न्यायाधीश म्हणून काशिनाथ त्रिंबक तेलंग यांची नियुक्ती झाली. बालविवाह होऊ नयेत यासाठी त्यांनी काम केले. साधारण 1888- 1913 या पंचवीस वर्षाच्या कालावधीत या तीन न्यायमूर्तींनी न्यायदानाचे काम केले.

न्यायमूर्ती चंदावरकर यांनी अस्पृश्यता निवारणाच्या कामात श्री विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याला वर्षानुवर्षे मदत केली होती. 1901 साली त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसच अध्यक्ष पद भूषवलं होतं. उदरमतवाद यावर यांचा विश्वास होता.
परंतु न्यायाधीश झाल्यानंतर त्यांच्याविषयी रोश निर्माण होऊ लागला. जॅक्सन खून खटल्यात क्रांतीकारकांना शिक्षा सुनावणे, बाबाराव सावरकर यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा देणे, ताई महाराज प्रकरणात टिळकांच्या विरोधात निकाल देणे यामुळे नारायण गणेश चंदावरकर यांच्या खुनाचाही प्रयत्न करण्यात आला होता जो अपयशी ठरला. 

पुणेरी पगडी हे पेशवाईच प्रतीक आहे, थोडक्यात बहुजनांच्या शोषणाच प्रतीक आहे. पण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या कार्याची ओळख झाली की पुणेरी पगडी विषयी मनात क्षमाशील भावना दाटून येते. 1862 साली रानडे यांनी सामाजिक कार्य सुरू केले. 1901 ला त्यांचा मृत्यू होईपर्यंत उदारमतवाद घेऊन ते सामाजिक जीवनात कार्यरत राहिले. एलफिस्टन कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडणारे ते पहिले विद्यार्थी होते. 
बहुजन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करणे, विधवा विवाह साठी प्रयत्न शील राहणे, बालविवाह प्रतिबंधक कायद्यासाठी आग्रह धरणे, सामाजिक परिषद स्थापन करून सनातन मानसिकतेच्या कालबाह्य कल्पना झुगारून देणे, राष्ट्रीय काँग्रेसचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी तिच्या स्थापनेपासून कार्यरत राहणे, भारताची आर्थिक निती कशी असावी याचे वैचारिक खाद्य पुरवणारे......त्या कालखंडातील 35-40 वर्षातील असे एकही सामाजिक काम नव्हतं ज्याला रानडेंचा परिसस्पर्श नव्हता.
संस्थात्मक,संघटनात्मक काम करण्याची गरज ओळखून रानडे अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले.

💡 ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश भारतात आल्याने काय बदललं?

1813 साली ख्रिस्ती मिशनर्‍यांना भारतामध्ये धर्मप्रसार करण्याची परवानगी मिळाली. भारतीय लोक हे पशुवत आणि रानटी जीवन जगतात आम्ही त्यांना चांगले मानव बनवू असा ख्रिस्ती मिशनऱ्यांचा दावा होता.
( अस्पृश्यता आणि सती प्रथा असल्याने त्यांचा दावा चूक नव्हता.) 

भारतीय समाज शिकला तर त्यांना हिंदू धर्माचा फोलपणा समजेल आणि ते ख्रिस्ती होतील असं मिशनर्‍यांना वाटलं. याशिवाय इंग्रजी येणारा नोकरवर्ग त्यांना प्रशासन चालवण्यासाठी हवा होता. यातून त्यांनी शिक्षणाचा प्रचार प्रसार सुरु केला. 

पण

हेतू आणि परिणाम यात फरक पडला.

मॅकोले यांच्यानुसार शिक्षण पद्धती सुरू झाली. संस्कृत शिवाय इतर भाषांनाही प्राधान्य देण्यात आले. सरकारकडून मिळणारं आर्थिक सहाय्य इतर भाषांना मिळाले. इंग्रजी शिक्षण मिळाल्याने भारतीय शहाणे होतील आणि कधीतरी स्वातंत्र्याची मागणी करतील याची जाणीव खुद्द मॅकोले याला सुद्धा होती.

आणि झालेही तसेच.. इंग्रजी शिक्षणाचा प्रचार प्रसार सुरू झाल्याच्या 15 ते 20 वर्षाच्या आतच लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी पहिल्यांदा च ब्रिटिशांप्रमाणे भारतालाही पार्लमेंट असावे अशी मागणी केली. मिशनरी शाळेत शिकल्याने महात्मा ज्योतिबा फुले थॉमस पेन यांचे राइट्स ऑफ मॅन हे पुस्तक वाचू शकले. आणि बहुजन उद्धाराच स्फूलिंग त्यांच्या मनात पेटलं.... इतिहास घडला. 

ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून हिंदू धर्माची हेटाळणी होत होती तेव्हा ब्राम्होसमाज, प्रार्थनासमाज मानवधर्मसभा, आर्यसमाज ,सत्यशोधक समाज, सार्वजनिक परिषद यासारख्या संस्थानी उदात्त हिंदू धर्माच खरं स्वरूप लोकांमध्ये नेऊन प्रबोधनाचे काम केलं, परिणामस्वरूप ख्रिस्ती मिशनऱ्यांच आक्रमण थोपवता आलं..... आज हेच काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. 

ब्रिटिश भारतात आल्याने लिखित कायदा आला. कायद्यापुढं सर्व समान हे तत्व आलं. तत्पूर्वी मनुस्मुर्ती होती. मनुस्मृतीनुसार ब्राह्मण वर्णाला विशेष सवलत होती. ब्रिटिशांच्या आगमनाने पेशवाई जाऊन आपल्या सवलती गेल्या या दुःखातून पुण्यात ब्रिटिशांना सशस्त्र विरोध झाला का याचा विचार केला पाहिजे.

आधुनिक शिक्षण, लिखित कायदा, उद्योग, रेल्वे, संस्थात्मक कार्य, राष्ट्रीय भावना याचा उगम ब्रिटिश आगमनाने झाला.

1600 साली ईस्ट इंडिया कंपनीचे आगमन ते 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक होणं हा प्रवास आपण समजून घेतला पाहिजे. प्रजासत्ताक भारताचे लचके तोडणारी फॅसिस्ट राजवट अवतरण्यास आपली आळशी, कृतघ्न वृत्ती कारणीभूत आहे याची जाणीव होऊन आपण कृतिप्रवण झालो तर झालो.....

लेखकाला हेच तर हवं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...