ओपनहायमर - माणिक कोतवाल (050625)
22 एप्रिल 1904 रोजी रॉबर्ट चा जन्म एका ज्यु कुटुंबात झाला.
( हे सांगण्याचं कारण म्हणजे आजही भारतात मुस्लिम, दलित, आदिवासी कुटुंबात जन्म घेतल्यावर जे सोसावं लागतं ते युरोप अमेरिकेत ज्यु लोकांच्या वाट्याला तत्कालीन समाजात येत होतं. )
रॉबर्ट चे वडील उदार मनाचे होते.आपल्या मुलांसाठी करता येणारी सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे स्वतःला खरोखर काय हवे आहे हे शोधण्याची पुरेपूर संधी देणे होय. या विचाराचे असल्याने त्यांनी रॉबर्टला न्यूयॉर्कच्या इथिकल कल्चर सोसायटी या शाळेत टाकले.
" उपदेश नव्हे कृती " हे ब्रीद असलेल्या या संस्थेने रॉबर्ट वर मानवतावाद बिंबवला. आपले आयुष्य आणि भवितव्य याची सूत्रे स्वतःच्याच हातात घेतली पाहिजेत हे त्याला जाणवलं. वयाच्या दहाव्या वर्षी इयत्ता पाचवीत असताना रॉबर्ट चे मन विज्ञानाने व्यापून टाकले.
एखाद्या गोष्टीनी मनाची पकड घेतली की त्यापासून मृत्यूची भीतीही त्याला दूर करू शकत नव्हती.
जिज्ञासा, परिश्रम, चिकाटी च्या जोरावर 1922 ला तो हॉवर्ड- केंब्रिज मध्ये दाखल झाला. नील्स बोहर, जे जे थॉमसन, रुदरफोर्ड, पर्सी ब्रिजमन या नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या सहवासात तो घडला.
1927 मध्ये त्याने डॉक्टरेट ची पदवी मिळवली.
( वयाच्या 23 व्या वर्षी )
1939 साली जर्मन शास्त्रज्ञांनी अनुस्फोट घडविण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. युरेनियमचे न्यूट्रॉनशी टक्कर घडवून मोठा स्फोट करता येऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलं. ती बातमी वाचून रॉबर्ट विचारात पडला आणि नाझी फॅसिस्ट राजवटी ला रोखण्यासाठी अमेरिकेच्या बाजूने काम करण्यास प्रवृत्त झाला.
7 डिसेंबर 1941 पर्ल हार्बर वर जपानने हल्ला केला आणि रॉबर्ट ने आपले पूर्ण अवधान ऍटम बॉम्ब च्या निर्मितीवर केंद्रित केले.
मार्च 1943 लॉस अलामॉस चे उदघाटन झाले.आणि दोन वर्षात च त्रिणीटी ही अनुचाचणी अमेरिकेनी यशस्वी केली. 30 एप्रिल 1945 हिटलर ने आत्महत्या केली होती. पुढील 10 दिवसात जर्मनी ने शरणागती घेतली. जपानचा पराभव नक्की होणार होता.
जपान शरणागतीसाठी तयार होता, जपानची राज्यघटना आणि सम्राट पद शाबूत ठेवावे ही त्यांची अपेक्षा होती याउलट अमेरिकन अध्यक्ष यांचा बिनशर्त शरणागतीचा आग्रह होता. जपानच्या राजाने ते अमान्य केलं.
मग.... आवश्यकता नसताना अणुबॉम्ब चा वापर करण्यात आला.
मानवी वस्तीवर आणि पूर्वकल्पना न देता बॉम्ब हल्ला करण्यास मॅनहॅटन प्रकल्पतील वैज्ञानिकांचा विरोध होता, बॉम्ब निर्मितीनंतर त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
6 ऑगस्ट 1945 हिरोशीमा वर अणुबॉम्ब टाकण्यात आला.
9 ऑगस्ट 1945 नागासाकी वर अणुबॉम्ब टाकण्यात आला. मॅनहॅटन प्रकल्पातील वैज्ञानिक निराश झाले होते. नागासाकी वर बॉम्ब टाकण्याची गरज उरलीच नव्हती.
जपान ने शरणागती पत्करली आणि युद्ध संपल.
भाग 2
युद्ध समाप्ती नंतर अणू तंत्रज्ञान संयुक्त राष्ट्र संघ च्या नियंत्रणात असावे यासाठी ओपनहायमर प्रयत्न शील राहिला. अमेरिकेने सुपर बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब यांच्या निर्मिती मागे लागून जागतिक शांतता धोक्यात आणू नये यासाठी तो जाहीर भाषणे देऊ लागला होता. रशिया बरोबर अणु तंत्रज्ञान विषयक वाटाघाटी कराव्यात असे त्याचे मत होतो जेणेकरून शस्त्रास्त्र स्पर्धा, अणुयुद्धाचा धोका टाळता येईल. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रमन यांना हे मान्य नव्हतं.
1954 साली ओपेनहायमर चा security क्लिअरन्स काढून घेण्यात आला. म्हणजे ही व्यक्ती देशाप्रती एकनिष्ठ राहिल याचा भरवसा देता येतं नाही असं एकप्रकारे जाहीर करण्यात आला.
ओपेनहायमरने या निर्णयाला आव्हान दिले पण कार्यालयीन राजकारणा पुढे तो टिकला नाही.
ओपनहायमरने अणुबॉम्ब बनवून दिला होता त्याची उपयुक्तता संपली होती. गरज सरो, वैद्य मरो.... या धोरणप्रमाणे अमेरिका वागली.
मानसिक, शारीरिक रित्या समतोल गेलेला ओपनहायमर त्यानंतर कोणतंही वैज्ञानिक संशोधन करू शकला नाही. 18 फेब्रुवारी 1967 रोजी वयाच्या 62 व्या वर्षी तो अनंतात विलीन झाला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा