कशाप्रकारची पुस्तके वाचली पाहिजेत?
मला वाटते की आपण फक्त अशा प्रकारची पुस्तके वाचली पाहिजेत जी आपल्या संवेदनांवर, मनावर घाव घालतात, वार करतात. आपण वाचत असलेले पुस्तक जर मनावर वार करून संवेदना जागृत करत नसेल तर आपण कशासाठी वाचतोय? केवळ आनंदासाठी? बाबारे! जर केवळ आनंदच हवा असेल तर खरंतर पुस्तकांशिवाय आपण अधिक आनंदी होऊ, आणि ज्या प्रकारची पुस्तके केवळ आनंदच देतात, त्या प्रकारची पुस्तके कोणीही स्वतःच लिहू शकतो. पण आपल्याला अशा पुस्तकांची गरज आहे जी आपल्यावर एखाद्या आपत्तीप्रमाणे परिणाम करतात, आपल्याला मनापासून दुःखी करतात, आपल्यापेक्षा अधिक प्रिय असलेल्या एखाद्याच्या मृत्यूसारखे, आत्महत्यांसारखे, सर्वांपासून दूर जंगलात हद्दपार झाल्यासारखे, खोलवर प्रभाव सोडतात. पुस्तक ही आपल्यातील गोठलेल्या समुद्रावर वार करण्यासाठी एक कुऱ्हाड असली पाहिजे, असा माझा विश्वास आहे.
-फ्रान्झ काफ्का
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा