मुख्य सामग्रीवर वगळा

वाचणाऱ्याची रोजिनीशी - सतीश काळसेकर

वाचणाऱ्याची रोजिनीशी - सतीश काळसेकर (190625)



अन्न, वस्त्र, निवारा यानंतर वाचन ही ज्यांची चौथी मूलभूत गरज आहे अशा पुस्तकवेड्या व्यक्तीने त्यांचा वाचनप्रवास, पुस्तकं संग्रह, वाचतानाची निरीक्षणं याचं विस्तृत वर्णन या पुस्तकात केलं आहे. 

मराठी, हिंदी, इंग्लिश साहित्य, दिवाळी अंक आणि विविध लेख, चित्रपट यांची ओळख या पुस्तकात करून दिली आहे. 

विश्व सतत प्रसरण पावत आहे अगदी तसंच पुस्तकांचे जग विस्तारत आहे, दोघांचा अदमास आपल्याला कधीही लागणार नाहीये....या जाणिवेने मन सुन्न होतं

"फक्त या आयुष्यात खूप वाचायचे राहून जाणार आणि याहून दुसरे आयुष्य आता हाताशी नाही."

लेखकाच्या या भावनेशी वाचक समरस होतो..

सतीश कळसेकर यांनी वाचकांना सुचवलेल्या काही पुस्तकांची यादी पुढीलप्रमाणे 

👉🏻 लोकोत्तर गाडगेबाबा जीवन आणि कार्य - प्रा द ता भोसले(ग्रंथाली प्रकाशन)
👉🏻 संत गाडगे महाराज स्मारक ग्रंथ (संपादक-रा तू भगत, चैतन्य प्रकाशन कोल्हापूर)(पाने 860)
👉🏻 सर्वोत्तम भूमिपुत्र - डॉक्टर आ ह साळुंखे 
👉🏻 पंख गळून गेले तरी - सुधीर देवरे
👉🏻एका स्वागताचीध्यक्षाची डायरी- उत्तम कांबळे
👉🏻गर्द रानात भर दुपारी- विजय पाडळकर
👉🏻लहजा- रोहिणी भाटे(मौज प्रकाशन)
👉🏻 इडा पिडा टळो ( देशमुख आणि कंपनी)
👉🏻 साखर फेरा - मोहन पाटिल ( कॉन्टिनेन्टल प्रकाशन )
👉🏻 शेती पहावी करून - श्रीनिवास पंडित 
👉🏻 कथा मुंबईच्या गिरण गावची: गिरणी कामगारांचा मौखिक इतिहास - नीरा आडारकर(मौज प्रकाशन)
👉🏻माय लाईफ - फिडेल कास्ट्रो
👉🏻मोरनामा आणि इतर कथा - इंतजार हुसैन (अनुवाद भा ल भोळे)
👉🏻 किमयागार -अच्युत गोडबोले 
👉🏻 हे स्वातंत्र्य कोणासाठी - लक्ष्मण गायकवाड
👉🏻बिराड- अशोक पवार
👉🏻पालातील माणसं- विमल मोरे
👉🏻तीन दगडाची चूल - विमल मोरे
👉🏻 गावठाण - कृष्णात खोत
👉🏻 मेड इन इंडिया -पुरुषोत्तम बोरकर 
👉🏻 टॉर्च टॉय यांच्याशी पत्र संवाद - प्रा ग प्र प्रधान
👉🏻 कहानी एका लोक विलक्षणाची - भगवंत क्षीरसागर ( संगत प्रकाशन नांदेड )
👉🏻 वॉर्ड नंबर पाच के एम - डॉक्टर रवी बापट 
👉🏻 मूक वेदना काळोखातील भारताची - अनुवाद वृंदा भार्गवे (विचार प्रकाशन)
👉🏻 माझे बारा वर्षाचे काम उर्फ ज्ञानकोश मंडळाचा इतिहास - श्रीधर व्यंकटेश केतकर.

("या सर्व गोष्टी केल्या त्या अर्थात कीर्ती च्या आशेने केल्या नाहीत. कारण कीर्ती म्हणजे काय तर आपण करतो त्याची जाहिरात. ती करण्याकडे जर लक्ष जास्त जाऊ लागले तर कार्य अपुरे पडते व कीर्तीची लालसा कर्तृत्व सतत ठेवण्यास आडवी येते. काही वय उलटले व कीर्ति उपभोगली म्हणजे कीर्तिलोभाची प्रेरक शक्ति कमी होते. आजपासून अनेक दशकांनी माझ्या संशोधनाची जाणीव उत्पन्न होईल ही माझी खात्री आहे. शिवाय कीर्ति तरी कोणाची मिळवावयाची? सध्याच्या पिढीत जो समाजशास्त्रज्ञ वर्ग आहे तो मला फारच अल्प कर्तृत्वाचा वाटतो व त्यामुळे त्यांच्या प्रशंसेची लालसा माझ्या कार्यक्रमात बंध उत्पन्न करू शकत नाही. )
👉🏻आयदान - उर्मिला पवार 
👉🏻बलूतं -दया पवार 
👉🏻ब्र- कविता महाजन
👉🏻मौनराग- महेश एलकुंचवार
👉🏻आत्मचित्र- राम गबाले
👉🏻गायपातं- दिनकर दाभाडे
👉🏻वनप्रस्थ- गणेश देवी 
👉🏻 स्पर्श मानव्याचा- विजया लवाटे
👉🏻 आठवणींचे पक्षी - प्र ई सोनकांबळे 
👉🏻 काट्यावरची पोटं- उत्तम बंडू तुपे 
👉🏻 अक्करमाशी- शरण कुमार लिंबाळे 
👉🏻 उपरा- लक्ष्मण माने   
👉🏻 उचल्या - लक्ष्मण गायकवाड 
👉🏻आभरान - पार्थ पोळके 
👉🏻 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे समग्र साहित्य - महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ 
👉🏻मी इझाडोरा - राजहंस प्रकाशन 
👉🏻 कातळाखालचं पाणी - संभाजी भगत 
👉🏻काळे गाणे - मरियम मकेबा (कमल प्रकाशन)
👉🏻 खाली जमीन वर आकाश - डॉक्टर सुनील कुमार लवटे 
👉🏻 फु बाई फु - शाहीर विठ्ठल उमप 
👉🏻 परिव्रजक -गौतमीपुत्र कांबळे 
👉🏻 पेशवाईत मेलेला पांढरा उंदीर - डॉक्टर कुमार अनिल 
👉🏻 व्यवहाराचा काळा घोडा - अजीम नवाज राही 
👉🏻 वाट तुडवताना -उत्तम कांबळे 
👉🏻रास - सुमा करंदीकर 

(श्री सतीश काळसेकर यांनी सुचवलेल्या पुस्तकांच्या पूर्ण यादी साठी पुस्तकं पाहावे.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...