आधार नसलेली माणसं - मित्तल पटेल (201125)
मित्तल पटेल यांना सरकारी अधिकारी व्हायचं होतं. पत्रकारितेचा कोर्स करताना त्यांचा ऊसतोड कामगारांच्या जीवनाशी संबंध आला. त्या काही काळ कामगारांच्या पालावर राहिल्या. त्या अनुभवाने त्यांचे जीवन ध्येय बदललं. परिघा बाहेरच्या भटक्या जमातींच जगणं, त्यांचे प्रश्न शहरी लोकांसमोर,शासन व्यवस्थेसमोर आणण आणि त्यातून अपेक्षित परिणाम साधनं यासाठी त्या काम करतायेत.
डफेर (फिरस्ती) समाजाला मतदानाचा हक्क मिळवून देणं...
वाडिया गावातील महिलांना सन्मानाने जगण्याची संधी देणं....
बेघर लोकांना पक्क घर मिळावे यासाठी काम करणं....
शासन व्यवस्थेतील जाचक नियम भटक्या समाजासाठी पूरक करणं....आदी कामे त्या करतायेत.
अज्ञान दारिद्र्य यामुळे शोषितांना आवाज नसतो त्यांचा आवाज होण्याचं काम मित्तल पटेल या करतात.
अनवट वाट चालणाऱ्या, सामाजिक बांधिलकी जपून कर्तव्य भावनेने कार्य करणाऱ्या मित्तल बेन यांचे अनुभव कथन एक वेळ जरूर वाचावे.
कारण
"सुखी माणसांनी दुखी माणसांची चिंता करायला हवी."
असा संदेश त्या कृतीतून देतात.
💡मनातलं
आपण अडचणीत आलो तर सावरून घेणारी जीवाभावाची माणसं असण, त्यांनी आर्थिक मानसिक सहाय्य करण ही खूप मोठी जमेची बाजू आहे.
'कायमचा पत्ता' नसणारी माणसं आपल्या भोवतालच्या जगात वावरत आहेत. आठवडा पंधरा दिवसांनी त्यांचे बिऱ्हाड नवीन गावात स्थिरावत. थंडी ऊन पाऊस यापासून संरक्षण करणार पक्क घर यांना नसतं.
भटकंती करत जीवन जगणारी ही कुटुंब मुसळधार पावसात स्वयंपाकासाठी सरपाण कुठून आणत असतील? पावसात चिखलात चूल कुठे मांडत असतील? फिरस्तीवर असल्याने मुलांच्या शिक्षणाच काय? वैद्यकीय निकड भासली तर पैसे कुठून आणणार?
स्थिर आर्थिक उत्पन्न नसल्याने भटकंती करत जीवन जगावं लागण, त्यामुळे एक पत्ता नसण ही खूप वाईट गोष्ट आहे. परीगाबाहेरची ही लोकं अन्यायग्रस्त,अभावग्रस्त आहेत. याला समाजव्यवस्था जबाबदार आहे.
मी, तुम्ही, आपण सर्वांनी मिळून बनलेला समाज.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा