मुख्य सामग्रीवर वगळा

Innovate like Elon musk -Tiisetso Maloma

Innovate like Elon musk -Tiisetso Maloma(291124)



इलोन मस्क या उद्योगपतीच्या कर्तुत्वाने, नवनिर्मितीने मानवता एक पाऊल पुढे टाकत आहे. सॉफ्टवेअर,सॅटेलाईट,कार मॅन्युफॅक्चरिंग, सौर ऊर्जा, वाहतूक व्यवस्था, इंटरनेट इत्यादी विविध क्षेत्रात त्यांनी अमुलाग्र बदल केले, नवीन कल्पना सुचवल्या.

Paypal कंपनीद्वारे ऑनलाईन बँकिंगची सुविधा त्यांनी सुरू केली. त्या कंपनीची विक्री करून Space x आणि Tesla ची स्थापना केली. 
अवकाशात उपग्रह सोडल्यानंतर अग्निबाणाचा पुन्हा उपयोग करता येत नव्हता. यामुळे उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च भरमसाठ होता. अग्निबाणाचा पुनर्वापर करणे जे आजपर्यंत कोणीही केलं नव्हतं, NASA लाही शक्य झालं नव्हतं ते या अवलियाने करून दाखवलं. 

Tesla कंपनीच्या रूपाने त्यांनी इको फ्रेंडली चार चाकी गाडी तयार केली. त्यामध्ये लिथियम आयन बॅटरी चा उपयोग केला जे यापूर्वी कोणी केलं नव्हतं.मोबाईल सॉफ्टवेअर अपडेट करतो त्याप्रमाणे या कारच्या सॉफ्टवेअरच्या अपडेट्स ग्राहकांना मिळतात. चालक विरहित गाडी तयार करण्याचे नाविन्यपूर्ण स्वप्न त्यांनी पाहिले आणि सत्यात उतरवले.

इलॉन मस्क यांनी स्टार लिंक या कंपनीची स्थापना केली. नजीकच्या भविष्यात ही कंपनी भारतात व्यवसाय करू लागेल.

नवनिर्मितीची या माणसाची भूक आणि ती साध्य करण्याची क्षमता याला मर्यादा नाहीत. हे सर्व यांना शक्य कसं होतं, याचा शोध घेतल्यास फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंग ही संकल्पना समोर येते.

First principal thinking
(सौजन्य chatgpt )

प्रथम तत्त्व विचारसरणी (First-Principles Thinking) ही एक समस्या सोडवण्याची पद्धत आहे, ज्यामध्ये एखाद्या समस्या किंवा कल्पनेला तिच्या मूळ, मूलभूत तत्त्वांपर्यंत घटकांमध्ये विभागले जाते आणि तेथून उपाय तयार केला जातो. पारंपरिक दृष्टिकोन, गृहीतके किंवा तुलना यावर अवलंबून न राहता, ही पद्धत तर्कशुद्ध विचार करण्यावर आणि विषयाची सखोल समज मिळवण्यावर भर देते.

प्रथम तत्त्व विचारसरणीची मुख्य वैशिष्ट्ये:
घटकलकरण (Reductionism): समस्या तिच्या सर्वात साध्या भागांमध्ये विभागणे आणि त्यातील मूलभूत सत्य समजून घेणे.
गृहीतके तपासणे: कोणत्याही गृहीतकांना प्रश्न विचारणे आणि त्यांचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पुनर्विचार करणे.
पुनःनिर्मिती (Rebuilding): ओळखलेल्या मूलभूत तत्त्वांवर आधारित संकल्पना किंवा उपाय पुन्हा तयार करणे, पारंपरिक पद्धतींवर अवलंबून न राहता.
उदाहरण:
तुम्हाला अधिक कार्यक्षम बॅटरी तयार करायची आहे. पारंपरिक डिझाईन्स सुधारण्याऐवजी (सामान्य विचार), तुम्ही विचाराल:

बॅटरीचा उद्देश काय आहे? ऊर्जा साठवणे आणि सोडणे.
तिच्या मूलभूत घटकांमध्ये काय आहे? अॅनोड, कॅथोड, आणि इलेक्ट्रोलाइट.
या घटकांसाठी अधिक चांगल्या सामग्री कोणत्या असू शकतात? पारंपरिक सामग्रीऐवजी लिथियम-सल्फर किंवा सॉलिड-स्टेट तंत्रज्ञान तपासा.
फायदे:
नवकल्पनांना चालना मिळते.
पूर्वग्रह आणि समूहाचा विचार टाळते.
सर्जनशीलता वाढवते आणि नवीन उपाय शोधण्यास प्रोत्साहन देते.
उदाहरणार्थ: एलॉन मस्क यांनी रॉकेट्स स्वस्त बनवण्यासाठी प्रथम तत्त्व विचारसरणी वापरली. त्यांनी विचार केला की रॉकेट तयार करण्यासाठी लागणारे मूलभूत साहित्य कोणते आणि ते स्वस्तात कसे मिळवता येईल. त्यामुळे त्यांनी पारंपरिक खर्चाच्या तुलनेत खूप कमी खर्चात रॉकेट तयार केले.(सौजन्य -chatgpt )

पैसा मिळवणं हे त्यांचे ध्येय नव्हतंच पण तो मिळत गेला आणि ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले.
अपरिमित जिज्ञासा ,कष्ट करण्याची प्रवृत्ती, चिकाटी, बेभान होऊन स्वप्नांचा पाठलाग करण्याची हिंमत या गुणांच्या जोरावर इलॉन मस्क मानव जातीच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी कामं करतायेत. 

_सिद्धेश्वर 

पुस्तकातील उतारे 

👉🏻I see Elon as a combination of Henry Ford, Thomas Edison, and Steve Jobs, of our time.

👉🏻A novelty is that which did not exist before. When creating a novel innovation, you create something completely new that did not exist before.

👉🏻With the goal of reducing space transportation costs, SpaceX was founded.

👉🏻In 2021 Musk tweeted, “SpaceX is starting a program to take CO2 out of atmosphere & turn it into rocket fuel.”
He added that it would be important for Mars. Such a mechanism could be one of the ways to repower a trip back from Mars.

👉🏻It is important to always remain on the lookout for new ideas and improvements and to have a technically capable team in place to make them a reality.

👉🏻No one else made reusable rockets and SpaceX decided to re-engineer and re-imagine the workings of rockets. They engineered them so they could reuse them and thus save costs.

👉🏻true innovators understand the value of taking action.

👉🏻In an interview, Musk described first-principle thinking as akin to examining a battery.
While others may accept the notion that batteries are inherently expensive, a first-principle thinker would delve deeper and inquire about the specific materials involved, assigning a cost to each component.

👉🏻Tesla applied first-principle innovation with their launch batteries. Tesla was the first automaker to make a battery with thousands of small cylindrical, lithium-ion commodity cells like those used in electronics – and arranged in parallel.

👉🏻The approach of first-principle thinking is also exemplified by The Boring Company, as they developed their own drilling machine with the goal of creating something ten times superior to existing options.

👉🏻Hires smart people and let them figure solutions

👉🏻If it was hard in the past, it might be easier today. So, attempt.
All these well-documented discoveries, failures or errors in the past are lessons and tools for anyone building anything in the present or future – be it rockets or cars.

👉🏻“I think college is basically for fun and to prove that you can do your chores, but they’re not for learning,” said Musk at the Satellite 2020 conference.

👉🏻Tesla and SpaceX are known to recruit people who’ve worked on interesting projects and written interesting papers; and with or without academic qualifications.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...