Life is absurd. (101024)
आईने दुसरा विवाह केला, आठ वर्षाच्या मुलाला अनाथ आश्रमात ठेवले. मुलाला आईचा विरह सहन झाला नाही, ती भेटायला आली की "मला तुझ्याबरोबर घेऊन चल " असा आग्रह तो करायचा.. ती त्याची तेवढ्यापुरती समजूत काढायची.
त्या आठ वर्षाच्या कोवळ्या मुलाला मानसिक सुरक्षेची गरज होती, नाही पूर्ण झाली. सगळे झोपले असताना मानसिक ताणातून त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
वय फक्त आठ वर्षे!
ही हत्या आहे, याचे दोषी कोण?
1)आई जर आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असती तर तीने मुलाचा सांभाळ केला असता.
2) मुलाचे सावत्र वडील विचाराने प्रगल्भ असते तर त्याने पत्नीबरोबर तिच्या मुलाचाही स्वीकार केला असता.
3) अनाथ आश्रमात मुलाची भावनिक गरज का पूर्ण झाली नाही? त्याचा विश्वास का मिळवला नाही? तेथील स्टाफ कुशल नसावा का?
4)आर्थिक, शैक्षणिक व संधीची समानता असती तर आई सक्षम झाली असती ना?
आठ वर्षाच्या कोवळ्या मुलाची आत्महत्या याला समाजाचे घटक म्हणून प्रत्येक जण जबाबदार आहे, प्रत्येकजण.....
_सिद्धेश्वर
एक स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर ती तिच्या मुलाला सांभाळू शकते.पुरुष स्त्रीला स्वीकारेल पण तिच्या मुलांना नाही स्वीकारणार
उत्तर द्याहटवा