चित्रपट आणि पुस्तकं आपल्यावर प्रभाव टाकतात. चांगल पुस्तकं, चित्रपट जीवनाची समज वाढवतं. आवडलेले पुस्तक वाचताना आपण तल्लीन होऊन जातो, पात्रांशी एकरूप होतो. चित्रपट पाहताना घटना वेगाने घडत असतात. थांबून विचार करायला फुरसत नसते. चांगला, नावाजलेला, कोणी सुचवलेला चित्रपट पहिल्या नंतर आपण त्यावर फ्रेम टू फ्रेम विचार करायला वेळ दिला पाहिजे.
आवडत्या पुस्तकाचा,कादंबरीचा अर्थ (आस्वाद) समजून घेण्यासाठी आपण थांबतो, विचार करतो तसंच चित्रपट पाहून झाल्यावर केलं पाहिजे.
SIRAT हा स्पॅनिश चित्रपट आहे. यंदा ऑस्कर साठी नामांकन मिळालं आहे, म्हणून माहिती झाला. मित्राने must watch सांगितले, पाहिला. मी निःशब्द झालोय, मनाच्या वेगळ्या ट्रान्स मध्ये गेलोय.चित्रपट, त्यातील पात्र, त्यांचे संवाद, त्यांची मानसिकता समजून घेण्यासाठी वेळ देतोय.ही प्रोसेस माणसांकडे पाहायचा दृष्टिकोन विकसित करत असेल का?...
SIRAT स्वर्ग - नर्क यांना जोडणारा अरुंद पूल, ज्याची धार तलवारीच्या पाताप्रमाणे आहे.
🚫 पुढे वाचल्यास चित्रपटचा 'स्पॉईलर' आहे
एक बाप (Luis) आपल्या मुलीच्या (Mar) शोधात वाळवंटातील रेव्ह पार्टीत आला आहे. सोबत त्याचा 9-10 वर्षाचा मुलगा (Estabel) आहे. तिथे मुलगी सापडत नाही. त्याला माहिती मिळते,दक्षिण वाळवंटात ही अशीच पार्टी आहे. पार्टीला जायचा विचार करणाऱ्या इतर पाच अनोळखी लोकांबरोबर तो दक्षिणेकडे निघतो. अनोळखी माणसांबरोबर स्नेहबंध निर्माण होऊ लागतो .माणसं मुळात चांगली असतात पण मनाच्या pre conditioning मुळं आपण अविश्वास दाखवतो. असो
आयुष्याची उलथापालथ करणाऱ्या घटना त्या प्रवासात घडतात. ते भटकतात, माईन पेरलेल्या विस्तीर्ण वाळवंटात अडकतात. विस्फोटात त्यांच्या गाड्या निकामी होतात. हतबल होऊन मृत्यूची वाट पाहत असताना Luis ते 70-80 मीटर चं अंतर पार करतो. दुसरा त्याला विचारतो...
How did you manage to cross? How does this work?
Luis म्हणतो I don't know? I crossed without thinking?
आपण आयुष्याबद्दल फार विचार करत राहतो, कल्पनेतील चिंतांनी झुरत राहतो. प्रत्यक्ष कृतीची वेळ आलेली असताना हातबल होऊन बसतो. I crossed without thinking असं म्हणणारा Luis नकळत जीवनाचं मर्म सांगतोय.
आपण विचार खूप करतो, अनुभव कमी घेतो आणि कृती त्याहून कमी करतो.
आपण स्वतः,आपले प्रियजण किंवा आपल्याला भेटणारी माणसं हे सर्व अनित्य आहे. कोणतं बोलणं हे अखेरच निरोपाचं असेल आपल्याला माहिती नाही हे सांगणारा SIRAT चित्रपट नक्की अनुभवावा.
Don't be serious, just feel it, live it, do it...
_सिद्धेश्वर
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवाखूप छान सारांश सांगितला आहे सर
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा