हत्तीचं पिल्लू लहान असताना त्याच्या पायांना मजबूत साखळदंडांनी बांधलं जातं. ते पिल्लू धडपडतं, प्रयत्न करत पण साखळदंड तोडू शकत नाही. त्या पिल्लाचं बलदंड हत्तीत रूपांतर झाल्यावरही ते साखळदंड तोडत नाही. मनाची धरणा त्याला माहुताच्या तालावर नाचवते. चुकीच्या धरणेमूळ हत्ती गुलामीत खितपत पडतो.
बालपणापासून देव धर्म याबाबत आपल्याही धारणा कृत्रिम रित्या तयार केल्या जातात. हत्तीच्या पिलाप्रमाणे आपली गत होते.
आपल्या बंदिस्त विचारांचे साखळदंड तोडण्याचे काम "तर्कीष्ट" या पुस्तकातील लेख करतात. प्रत्येक घरात हे पुस्तक असावं त्याच वाचन व्हावं. अशी अशा व्यक्त करण्याशिवाय काय करता येईल???
वयाच्या अठरा वर्षे पर्यंत आपल्या मुलांवर कोणताही देवधर्म लादू नये. कळत्या वयात आल्यानंतर धर्मग्रंथ वाचून त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्यावा. त्यांना दिलेली ही सर्वोत्तम भेट असू शकते .
या पुस्तकाच्या वाचनानंतर माझ्या मनात एक काल्पनिक संवाद स्फूरलाय तो पुढे देत आहे.
(संवाद - शांताराम खंडेराव या दोन व्यक्ती मध्ये घडतोय.)
शांताराम - तो सगळीकडे आहे आणि तो सर्व काही पाहतोय....तुमची प्रार्थना,अडचणी, संघर्ष,संयम, कर्म आणि दिखावे सुद्धा.
खंडेराव - हो का? बरं मग....
शांताराम - तू त्याची आराधना, उपासना केली पाहिजे.
खंडेराव - म्हणजे काय केलं पाहिजे?
शांताराम - उपास, व्रतवैकल्ये, अभिषेक करायला पाहिजे. मठ मंदिर अशा ठिकाणी जाऊन प्रार्थना करायला पाहिजे.
खंडेराव - माझा विचार तुला लक्षात येईल का? जाऊदे राव तो विषय....
शांताराम - साल्या तू नास्तिक आहे ना??
खंडेराव - स्वार्थ साधण्यासाठी, फलप्राप्तीसाठी कोणाची हुजरेगिरी करायची हे मला जमत नाही. मग तो तुझा देव का असेना?
शांताराम - नीट बोल.
खंडेराव - कार्यालयातील वरिष्ठांची चापुलसी करून सवलती मिळवणे आणि तू म्हणतो तशी देवाची आराधना करून फलप्राप्तीची अशा बाळगणे यात फरक काय आहे?
शांताराम - देवाची आराधना केल्याने मानसिक शांती मिळते, समाधान मिळते, मन प्रसन्न होतं.
खंडेराव - यासाठी मी धावायला जातो. तुकाई टेकडीवर फिरायला जातो. मेहनत कसरत करून घाम निथळला की मला फार बरं वाटतं.
शांताराम - ते तर ठीक आहे. पण देवाचा सुद्धा करावं लागतं. त्याने विशेष समाधान लागतं.
खंडेराव - झाडांच्या पानांची सळसळ, पक्षांचा आवाज, मावळतीला जाणारा सूर्य, निरव शांतता हे सर्व मला अंतर्मुख करतं. मन प्रसन्न होतं. शांत वाटतं. याने माझे समाधान होतं.
शांताराम - पुन्हा तेच.... देवळात मठात का येत नाहीस ते सांग.
खंडेराव - तिथला गोंगाट, अस्वच्छता, व्यावसायिक स्वरूप पाहून मला शिसारी येते. काय तर म्हणे अभिषेक करा,शांती करा, होम हवन करा, तुमच्या अडचणी दूर होतील.
असं कुठं असतं का?
शांताराम - तू केलं नाही तर तुला प्रचिती कशी येईल?
खंडेराव - या अशा गोष्टी केल्याने देव प्रसन्न होऊन माझ्या अडचणी दूर करेल का?
शांताराम - हो मग.
खंडेराव - नाही, असं होत नसतं. तुझ्या मनावर हे बिंबवलं आहे.
शांताराम - कोणी?
खंडेराव - देवाच्या नावाने धंदा मांडलाय त्यांनी आपल्याला चुकीचा धर्म शिकवलाय. नवसाला पावणारा देव अशा कांड्या पिकवण्यामागे त्यांचा धंदा असतो, आर्थिक लागेबंध असतात.
शांताराम - काहीतरीच तुझं
खंडेराव - मित्रा बरीच माणसं आर्थिक विवंचनेने, शारीरिक व्याधींनी ग्रासलेली आहेत.त्यांच्या जीवनात असुरक्षितता आहे. भावनिक रित्या, मानसिकरित्या अस्थिर असलेली माणसं हेरून खोटा दिलासा दिला जातो.
शांताराम - हतबल व्यक्तीला दिलासा तर मिळतो ना?
खंडेराव - खोटा दिलासा घेणं म्हणजे वस्तुस्थिती पासून पळ काढणे आहे. असा दिलासा काही व्यक्तींना दारू सेवनाने मिळू शकतो मग दारू प्यायला प्रोत्साहन द्यायचे का?
शांताराम - व्यवसाय चालत नाही, मुलीचे लग्न जमत नाही, असह्य व्याधी आहेत..... अशा असंख्य अडचणींच निराकरण करून घेण्यासाठी लोक मठात जातात. इतके सर्व लोक वेडे आहेत का?
खंडेराव - बिचारे हतबल झालेले असतात. करून पाहायला काय हरकत आहे असं म्हणून जातात.
शांताराम - पण बऱ्याच जणांना प्रचिती येते ना?
खंडेराव - ठराविक गोष्टी हायलाईट केल्या जातात. असा कोणताही ऑथेंटिक डाटा उपलब्ध होऊ शकत नाही.
"आडात नाही तर पोहऱ्यात येणार कुठून "
शांताराम - तू धर्मद्रोही हेकेखोर आहेस.
खंडेराव - मित्रा, सहमत नसलो तरी तुझ्या मताचा आधार आहे.
जगात कोणतीही गोष्ट कार्यकारण भावा शिवाय घडत नाही. चमत्कार नसतो. तसा दावा करणारे भामटे असतात. या शाश्वत सत्याची प्रचिती मी घेतली आहे. तारतम्य ठेवून विचार केल्यास तुलाही येईल.
अशोक खरात, बाबा राम रहीम, आसाराम बापू, बागेश्वर बाबा, अनिरुद्ध बापू, तथाकथित स्वामी, महाराज..... यांनी असं कोणतं तत्त्वज्ञान दिलं आहे? हात चलाखी करतात, भोळे भाबडे भक्त बोंब मारतात आणि या प्रवृत्तीचा बोलबाला होत राहतो.
तू विचार कर तर्क लाव.
शांताराम - तर्क नको लावू. भक्ती भावाने श्रद्धा ठेव. तुला प्रचिती येईल.
खंडेराव - Doubt is the origin of wisdom. शंका घेणे ही शहाणपणाची सुरुवात आहे असं रेने देकार्ट सांगून गेलाय.
क्रिटिकल थिंकिंग ही गोष्ट शिकावी लागते. आपल्या धरणांवर प्रश्न उपस्थित करून त्या तावून सलाखून घेतल्या पाहिजेत.
शांताराम - मी MCS आहे. क्रिटिकल थिंकिंग च्या बाता मला काय करतोस?
खंडेराव - शिक्षण आणि क्रिटिकल थिंकिंग याचा फारसा संबंध नसतो.
शांताराम - आला मोठा शहाणा...
खंडेराव - कुटुंब समाज टीव्ही.... इत्यादी माध्यमातून बालपणापासून आपल्या मनाचे कंडिशनिंग होतं राहतं. त्या धारणा पक्क्या होत जातात. आपल्याला प्रश्न पडत नाहीत.
गाभाऱ्यात सोवळ घालूनच का प्रवेश करायचा?
मासिक पाळी अपवित्र असं म्हणून महिलांना प्रवेश नाकारला जातो, मग पडसं झालेल्या व्यक्ती ला ही प्रवेश नाकारणार का?
घंटा का वाजवायची? प्रदक्षिणा का घालायची?
आपल्याला प्रश्न पडत नाहीत. नंदीबैला प्रमाणे आपण मान डोलावत राहतो . बहुजन समाजाच्या मानसिक गुलामीच हे फार मोठे कारण आहे.
क्रिटिकल थिंकिंग करून प्रश्न विचारले पाहिजेत. हा उद्धटपणा वाटला तरी चालेल पण सयंत भाषेत प्रश्न विचारले पाहिजेत. या प्रश्नांनी देवाचा कोप होणार नाहीये पण देवाच्या नावाने धंदा मांडला आहे त्यांचे दुकान बंद होईल.
शांताराम - तू देव मानतो का?
खंडेराव - हो.
शांताराम - त्याला प्रसन्न ठेवण्यासाठी तू काय करतो?
खंडेराव - इतरांना त्रास होणार नाही आणि माझ्या मनाला आंनद मिळेल अशी कामं करतो.
शांताराम - म्हणजे?
खंडेराव - फिरायला जाण, व्ययाम करणं, गरजू व्यक्तीला यथाशक्ती मदत करणं, आपलं कामं चांगलं करण्याचा प्रयत्न करत राहणं. इत्यादी बाबी मला समाधान आनंद देतात.
शांताराम - ठीक ए.. भेटू परत
खंडेराव - सकाळी टेकडीवर फिरायला येतोस का?
शांताराम - नाहीरे, उद्या शनिवारी आहे. मला तेल वाहयाला जायचंय.
खंडेराव - ठीक आहे.
👌👌
उत्तर द्याहटवा