मुख्य सामग्रीवर वगळा

ठसन - अविनाश उषा वसंत (ललित पब्लिकेशन )

ठसन वाचून झाली. मी निःशब्द झालोय. मनात निराशा दाटून आलीत. ठसन चा अनुभव शब्दातीत आहे. मनात कालवा कालव होते.... म्हणजे नेमकं काय सांगता येत नाही, हा अनुभव ज्याचा त्याने घेतला पाहिजे. अनुकंपा, संवेदनशीलता असणाऱ्या नसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ठसन वाचावी. समाज वास्तव, दुनियादारी, आपल्या परीघाबाहेर च जगणं समजत.

गिरणगावच्या अरुणोदय चाळीची, तिथल्या शोषित माणसांची, सुखवास्तु कुटुंबाने न पाहिलेल्या खऱ्या मुंबईची ही गोष्ट आहे. मुंबईतील गिरणी कामगार चाळीमध्ये राहायचा. ह्या चाळीची एक संस्कृती होती. त्या लोकांचा दैनंदिन संघर्ष, संस्कृती, स्वप्न याची जाण ठसन मुळे होते.

त्यांची चूक नसताना, क्षमता, पात्रता असूनही चाळीतील कित्येक मुला मुलींची स्वप्न करपून गेली, केवळ जन्माचे कैदी असल्यामुळे. 
हे भयाण वास्तव अंगावर येत. यांचं अभावग्रस्त जीवन पाहिलं की स्वतःची शरम वाटायला लागते. माझ्याकडे संसाधनांची विपुलता असूनही केलेला माज आठवतो. किती किती गोष्टी मी granted धरल्या.....

पान क्रमांक ९५ वर आलोय.... रोहिणीच्या विचाराने माझा कंठ दाटून आलाय. डोळे डबडबलेत. मी पुस्तक उलटं करून ठेवलं. लाईट बंद केली आणि समोरच्या भिंती कडे पाहत बसलो....
जे रोहिणीच्या बाबतीत झालं तेच मयुरीच्या बाबतीत झालं. पुरुषी मानसिकतेने मयुरीच्या स्वप्नांचा खून केला. एक चांगला खेळाडू खुरडून टाकण्यात आला. Life is not fair....

पची मोठा क्रिकेटर होऊ शकला असता पण.... 
असे असंख्य खेळाडू, कलाकार संधीच्या आभावामुळे नामशेष झाले... ठसन मुळे हे वास्तव जाणवतं, मन खंतावत.

पहाटे चार ला उठून चपात्या लाटणारी मयुरी, स्मशानात जाऊन अभ्यास करणारा चेंबल्या डोळ्यासमोर आले की...... काय बोलाव? किती ही अभावग्रस्तता.

'ठसन' कादंबरी दोनशे वर्षांनीही वाचली जाईल.या अभिजात साहित्याचा आस्वाद नक्की घ्या. 

💡पुढे स्पॉईलर आहे.

प्रसंग एक 

चेंबल्या आणि हवा ही दोन पोरं प्रेतावरील पैसे गोळा करतायेत. मिळालेल्या पैशातून वडापाव खायला जातात. भरपूर पैसे मिळाल्यावर त्यांना डोसा वगैरे खायचा आहे.
हवा चा बाप लाल सलाम वाला आहे . त्याला मिल मधून काढल आहे. हवा ची आई धुणं भांडी करून घर चालवते.

चेंबल्या आणि हवा हे जिवाभावाचे मित्र.

बँकेत नोकरी मिळेल या आशेने चेंबल्या, हवा चाळीतील पोरं खो खो खेळतायेत. जिल्ह्याला दोघांची निवड होते पण......
खो खो खेळताना मॅच रंगात आलेली, चेंबल्या पोल मारायला गेला आणि पोलच तुटला. चेंबल्या जायबंदी झाला. त्याचा खो खो कायमचाच सुटला.....
आणि बँकेतील नोकरीचे स्वप्न ही विरून गेलं .
( या ठिकाणी खो-खो मॅच चे केलेले वर्णन मनात थ्रिल निर्माण करतं. सामना आपल्यासमोर सुरू आहे, हवा बेभान होऊन वाचकासमोरून धावतोय असा आभास होतो.)

प्रसंग दोन -

अरुणोदय च्या टीमला जिंकण्यासाठी दोन बॉल दोन रन हवे होते. अंधार पडू लागलेला. बॉल एका बिळात गेला. हवा काढायला गेला तर चिचुंद्री त्याच्या बोटाला चावली. हवा पुन्हा बॉलिंग करू शकला नाही.

मन हेलावून टाकणारे, दुनियादारी समजावणारे असे अनेक प्रसंग कादंबरीत आहेत.वेगळी अनुभूती देणारी, trance मध्ये घेऊन जाणारी ठसन नक्की वाचा.

ग्रॅज्युएट - वडापावची गाडी चालवणारा 
सोन्या मोन्या - साऊंड सिस्टीम वाला 
पची - रमी क्लब चालवणारा 
चेंबल्या - भूषण कदम 
हवा - वैभव पवार 
बीबीसी - खोपडे काकू 
काठी - बापाची पॅन्ट चोरणारा 
व्हिजन - ज्ञान देणारा



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...