मुख्य सामग्रीवर वगळा

लीडर - कॉ. उमेश सूर्यवंशी (प्रयास पब्लिकेशन)

"ज्यांना इतिहास समजणार नाही, त्यांना वर्तमान समजणार नाही, ज्यांना वर्तमान समजणार नाही, त्यांना भविष्य घडवता येणार नाही"
__कॉ. गोविंद पानसरे


कॉम्रेड गोविंद पानसरे सर यांच्या कार्याची धावती ओळख करून देणार लीडर हे पुस्तक नुकतच वाचलं. पानसरे सर यांचे नाव माहीत होतं. ब्राह्मण्यवादी सनातनी विचारसरणीने कॉम्रेड गोविंद पानसरे सर यांची हत्या घडवून आणलेली .त्या बातमीने मला वाईट वाटलं होतं. त्यांच्या हत्येनं आपण नेमकं काय गमावलं याची जाणीव लीडर पुस्तकातून झाली.

आर्थिक, शारीरिक, मानसिक झळा सोसून खस्ता खाऊन कार्यकर्ते देह झिजवतात, वेळ खर्ची करतात.
समाजाचं भलं व्हावं, शोषणापासून मुक्ती व्हावी यासाठी त्याग करण्याची ही प्रेरणा कुठून येते ? बदल घडताना दिसत नाहीये, राजकीय यश मिळत नाहीये, तरी कार्यकर्ते थांबत कसे नाहीत? निराश, हताश कसे होत नाहीत?
या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लीडर मध्ये मिळतील.


ज्याच्याकडे विद्याबळ, अधिकारबळ, द्रव्यबळ नाही तो बहुजन हा विचार प्रमाण मानून कॉम्रेड गोविंद पानसरे सर 63 वर्षे सामाजिक जीवनात कार्यरत राहिले. कामगारांच्या हिताची बाजू घेऊन, त्यांचं संघटन करून ते भांडवलदारांशी लढले. घरकाम, मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या महिलांना संघटित केलं, हक्कासाठी लढायला शिकवलं. 

शिवाजी कोण होता? हे पुस्तक लिहून खरा इतिहास समोर आणला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाला मदत केली, गांधी मैदानातील यज्ञाला संघटित विरोध केला, टोलमुक्ती, दारूबंदी साठी आंदोलन केलं ..... इत्यादी कामामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे सर हे ब्राह्मण्यवादी सनातनी विचार धारेला अडथळा ठरू लागले.
सांस्कृतिक लढा लढताना बलिदानाची तयारी ठेवावी लागते. कॉम्रेड गोविंद पानसरे सर यांची ती नेहमीच होती आणि झालंही तसंच......... बहुजनांच्या उद्धारासाठी झटणारा विचारवंत, कृतिशील कार्यकर्ता सनातन्यांनी शरीर रूपाने संपवला.
आपल्याला भगतसिंगचा,कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा विचार पुढे न्यायचा आहे, शोषितांची बाजू घेऊन लढायचं आहे, सांस्कृतिक लढाई लढाईची आहे. यासाठी हे कृतिशील विचारवंत समजून घ्यावे लागतील. त्यासाठी लीडर हे पुस्तकं वाचणं अनिवार्य आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे माझ्या मनात जिवंत आहेत.

( कॉम्रेड तुमचं बलिदान व्यर्थ जाऊ देणारं नाही, लढाई सुरूच राहील...... लाल सलाम! )

💡पुस्तकातून 

👉🏽“तत्त्ववेत्त्यांनी जगाचा अर्थ सांगितला, प्रश्न आहे तो जग बदलण्याचा"

👉🏽आपल्या अंगीकृत कार्यात लोकांचा सहभाग करून घेऊन विचारांची चळवळ केली पाहिजे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...