मुख्य सामग्रीवर वगळा

लक्षवेध - रणजित देसाई ( मेहता पब्लिशिंग हाऊस )



लक्षवेध ही कादंबरी रणजीत देसाई यांनी लिहिली आहे. अफजलखानाचा वध हा विषय आहे. कादंबरी लिहिताना नाट्यमय काल्पनिक संवाद लिहून रंगत आणण्याचा प्रयत्न होणारच, पण इतिहासाची मोडतोड होऊ नये. ही रास्त अपेक्षा आहे, नाही का?

रणजीत देसाई यांनी लेखणीच्या, प्रतिभेच्या जोरावर इतिहासाचा (सत्याचा) मूडदाच पाडला आहे. स्वराज्यला फितूर झालेले इतर मराठा सरदार यांची नावं पूर्ण दिलीत. 
उदा. 1)खंडोजी खोपडे _ अफझल चा पोरगा फाझल खान ला पळून जाण्यासाठी मदत करणारा.
2) मंबाजीराजे भोसले (शिवरायांचे चुलत चुलते ) अफझल खान च्या वतीने चालून आले.
3) प्रतापराव मोरे (जावळीचे वतन मिळण्याची आशा )

पण स्वजातीचा असणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी याच्या आडनाव चा उल्लेख एकाही ठिकाणी केलेला नाही. 
एकवेळ इतपर्यंत ठीक.....

पण कृष्णा भास्कर कुलकर्णी हा अफझलखान चा वकील म्हणून आला आणि शिवरायांशी बोलल्यानंतर तो double agent बनून शिवरायांना मदत करू लागला असं फार खुबीने सुचवलं आहे. यालाच म्हणतात कलमकसाई.....

प्रत्यक्षात छत्रपती शिवरायांवर त्यांच्या हयातीत एकमेव वार झाला आहे, तो या कृष्णा भास्कर कुलकर्णी याने अफजलखानाच्या वतीने लढताना केला आहे. ब्रह्म हत्येचे पाप नको या समजेतून शिवरायांनी त्याला सावध केलेल, पण तरीही तो शिवरायांवर चालून आला. मग काय.... महाराजांनी समशेर चालवली आणि कृष्णा भास्कर कुलकर्णी याचं मुंडकं धडा वेगळं केलं. 

कादंबरी लिहिणाऱ्या रणजित देसाई यांना या सत्याचा विसर झाला. शिवरायांच्या डोक्याला जखम करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी होता तो अफझल खान असल्याच इथं सांगितलंय. काय म्हणणार या वृत्तीला????

माझे एक स्नेही रामदासी बैठकीला जातात. तिथे दर गुरुवारी निरूपण होत. तिथे त्यांना सांगण्यात आलं की अफजलखानाचं पारिपत्य कसं करावं याचं मार्गदर्शन रामदास यांनी 12 तास छत्रपती शिवरायांना केलं. हे आठवण्याचं कारण म्हणजे लक्षवेध कादंबरीत रणजित देसाई यांनी तोच कावा (ते आपल ) दावा केला आहे.

रामदास यांनी छत्रपती शिवरायांना निरूपण केल्याने अफझल वध झाला, असं बहुजनांच्या मनावर बिंबवण्याचा हा कावा आहे. बहुजनांच्या नायकांशी असत्याच्या आधारे ओढून ताणून संबंध जोडणे आणि ठराविक जातीचे श्रेष्ठत्व बिंबवणे हा यांचा उद्देश असावा. रामदास यांचा शिष्य चिदंबरम स्वराज्यासाठी हेरगिरी करताना मारला गेला असं दाखवलंय. अशा काल्पनिक प्रसंगातून रामदास यांचा स्वराज्य उभारणीत कसा संबंध आहे हे ओढून ताणून ठसवण्याचा प्रयत्न केलाय.
या चिदंबरम ला कृष्णा भास्कर कुलकर्णी मार्फत सोडवायला हवा होता असा संवाद शिवरायांच्या तोंडी देऊन निचपनाचा कळस गाठलाय.

( स्वराज्यद्रोही अनाजीपंत चिटणीस याला हत्तीच्या पायाखाली दिले म्हणून त्याचा खापर पंणतू असणाऱ्या मल्हार रामराव चिटणीस या कलम कसाई वृत्तीने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली. कारण, लिहिणारे तेच होते. स्वजातीचा असल्यास त्याला सांभाळून घेण्याची वृत्ती यांनी कायम ठेवली.)

💡भवानी मातेनी तलवार दिली????

शिवाजी महाराजांना भवानी मातेने तलवार दिली, असं सांगितलं जात, पण प्रत्यक्षात भवानी मातेने तलवार दिली नव्हती, असं होत नसत. चमत्कार हे पोथ्या पुराणातच होतात. भवानी मातेने तलवार दिली या दंत कथेच्या मागे दोन कारणे असू शकतात..
1) शिवाजी महाराजांना प्रत्यक्षात देवीने येऊन तलवार दिली. म्हणून ते पराक्रम गाजवू शकले.असं म्हणून महाराजांचा पराक्रम कमी लेखणे हा कुटील डाव असू शकतो.
(बाजीराव ला पेशव्याचा गणपती पावला म्हणून त्याने परक्रम गाजवला असं का कोणी म्हणत नाही? कारण........ (तुम्हीच विचार करा.))

2) आज ज्याप्रकारे ईडी सीबीआय यांची धमकी देऊन राजकीय पक्ष व त्यांचे नेते फोडले जातात तसंच अफजलखानाने वतन जप्त करायची धमकी, नवीन वतनं द्यायची आश्वासनं देऊन मराठी सरदारांना फोडायचं सुरू केलं होतं.(उदा. जावळीची वतनदारी प्रतापराव मोरे यांना देण्याच आश्वासन दिलेल.)

प्रत्यक्षात भवानी मातेने आशीर्वाद देऊन तलवार दिली आहे अशी अफ़वा पसरवून मराठी सरदारांचं खानाला मिळणं थांबवण्याचा चा प्रयत्न झाला असावा.

कारण कोणतं का असेना, शिवाजी महाराजांना प्रत्यक्षात भवानी मातेने येऊन तलवार दिली हा दावा धांदात खोटा आहे. महाराजांची देवाधर्मावर श्रद्धा होती पण प्रयत्न हाच परमेश्वर हे त्यांचे तत्व होतं.

💡अफझलखान वध 

अफजलखानाला जावळीच्या खोऱ्यात, प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीस आणणे ही मोठी कामगिरी होती. महाराजांनी, त्यांचे वकील गोपीनाथ पंत बोकील यांनी ही कामगिरी मोठ्या खुबीने पार पाडली. 
काही जणांच्या मते अफजलखानाला विश्वासात घेऊन महाराजांनी दगा केला. त्यांनी पुढील तथ्यांचा विचार करावा.

👉🏽अफझल ने शिवरायांचा मोठा भाऊ संभाजी यांच्याशी कनकगिरीच्या लढाईत दगा करून त्यांना जीवानीशी मारलं होतं.
👉🏽अफझल ने शिवरायांचे वडील शहाजीराजे यांना कैद करून विजापूर मध्ये मानहानी केली होती.
👉🏽तो 20 हजार ची फौंज घेऊन आला होता. द्रव्य बळ, बाहुबळ यात अफझल सरस होता.
👉🏽 शिवरायांना कैद करून आदिलशहाच्या दरबारात विजापूरला हजर करणे हा त्याचा उद्देश होता.
👉🏽अफझल शी समझोता म्हणजे जीवाणीशी जाणं वा स्वाभिमान गहाण टाकून, स्वराज्य च स्वप्न विसरून आदिलशाह च्या अंकित जाण होत.
👉🏽याच अफझलखानानं विजापूर दरबाराचा एक सरदार सिरे येथील नाईक याचा पराभव केला आणि तो तहासाठी आला असता त्याला मारलं.
👉🏽नाईक कस्तूरीजंग याच अफझलला शरण आला. त्यानं जीवदान मागितलं. कुराणावर हात ठेवून याच अफझलनं शपथ घेऊन त्याला समक्ष भेटीस बोलावलं आणि भेटीला आलेला असता त्याला कपटानं ठार मारलं.

अफजलखानाचा काटा काढून जुने घाव भरून काढणे आणि आदिलशहाला जरब बसवण्याशिवाय महाराजांसमोर पर्याय नव्हता. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी अफझल खान चा वध केला.

💡शिवरायांचे वेगळेपण 

शिवाजी महाराज सदैव सावध असायचे.
अफजल खानाचा विश्वास जिंकणं हे खूप महत्वाचं होत. खूप मोठं आर्थिक बळ असलेला शिवाजी कचदील झाला आहे असा आभास निर्माण करण्यात आला. अफझल ला आंधळा आत्मविश्वास देण्यात आला. 

अफझल चा काटा काढण्याची तयारी सुरु झाली. प्रत्येक बाबीच सूक्ष्म नियोजन करण्यात आलं. कोण अंगरक्षक असणार? त्याने नेमक करायचं काय? अफझल च्या फौंजे चा समाचार कसा घ्यायचा? पळून जायच्या वाटा कोणत्या? धारकरी कुठं थांबणार? सर्व काही micro level वर ठरवण्यात आलं.

इतकी सगळी तयारी करून आपलाही घात होऊ शकतो याची शक्यता महाराजांनी गृहीत धरली होती. जर काही अघटित घडलंच तर इतर मावळ्यांनी कच न खाता खानाबरोबर लढून त्याचं , त्याच्या फौजेच पारीपत्य करायची महाराजांची आज्ञा होती. हेच शिवरायांचे वेगळेपण आहे. आंधळा आत्मविश्वास ठेवल्यामुळे अफजलखानाने अशी कोणतीही तयारी केली नव्हती. त्याचा वध झाल्याचे समजल्याबरोबर त्याच्या सैन्याची पळापळ सुरु झाली. खुद्द अफझल चा मुलगा फाझलखान पळून गेला.

आपल्या मनाविरुद्ध घडू शकत अशी शक्यता गृहीत धरून त्याचीही तयारी करणं हा दुर्मिळ गुण आहे.

💡मनातलं 

10 नोव्हेंबर 1659 अफझल खान ला मारलं. त्या दिवशी महाराजांचं वय 29 वर्ष आठ महिने 22 दिवस होत. 30 वर्षाच्या शिवरायांनी दाखवलेले चातुर्य, साहस, नीती याचा अभ्यास केल्यास जीवनातील भीती नाहीशी होते. कसलंही संकट येउद्या, छातीवार घ्यायची ताकद जय शिवराय या शब्दामूळे मिळते.

तुमचं आमचं नातं काय
जय शिवराय जय शिवराय 

💡इतर माहिती 

👉🏽होता जिवा म्हणून वाचला शिवा.
अफजलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडा याने दांडपट्ट्याने छत्रपती शिवरायांवर वार केला तो वार हवेतल्या हवेत जिवा महाल यांनी परतवून लावला, सय्यद बंडा चा हात कलम करून.

👉🏽 महाराजांनी अफजलखानाचे पोट फाडल्यानंतर जखमी अवस्थेत तो बाहेर आला. पालखीत बसून पळून जाऊ लागला. शिवरायांचा अंगरक्षक संभाजी कावजी कोंढाळकर यांनी पालखी वाहणाऱ्या भोयांचे पाय कापले.
खानाच्या छातीत तलवार खुपसून त्याच शीर कलम करून ताब्यात घेतलं.

👉🏽अफझल खानाच शीर राजगडावर असणाऱ्या जिजाऊ माँ साहेबाना पाहायला जिवा महाल घेऊन गेले. राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या दरवाजात ते शीर सन्मानपूर्वक दफन करण्यात आलं.

👉🏽 प्रतापगड मोहिमेच्या आधी शंभूराजांच्या आई सईबाई यांचे निधन राजगडावर झालं.

👉🏽 संभाजी महाराजांचा जन्म सईबाईंच्या पोटी पुरंदर किल्ल्यावर झाला होता. त्यांना दूध कमी पडत होत म्हणून कापूरहोळच्या धाराई गाडे यांना आणलं होत,एकप्रकारे त्याही संभाजी राजांच्या आईच आहेत.

💡पुस्तकातील उतारे 

👉🏽जोवर त्यांचे आशीर्वाद आमच्या कार्याला आहेत, तोवर आम्ही पराजयाची भीती बाळगत नाही.

👉🏽संकटांचे ढग आले नाहीत, त्यांनी असंख्य जलधारांचा वर्षाव केला नाही, तर या भूमीत पेरलेलं बीज उगवणार कसं?

👉🏽बसल्या जागी संतापून संकट टळत नसतं.

👉🏽त्रागा करुन संकटं सुटत नसतात.

👉🏽पोशाख भिजला, तर बदलता येईल; पण मन भिजलं, तर कसं बदलायचं?

👉🏽“जन्माबरोबरच मृत्यूची जोड असते. त्याचं भय आम्हांस वाटत नाही. या मृत्यूचं आम्ही स्वागतच करु. तो वीरोचित यावा, एवढीच आम्ही दक्षाता बाळगत असतो.

👉🏽संकटाच्या वेळी परमेश्वरावरची श्रद्धा आणि मनातली निष्ठा कधीही ढळू न द्यावी. अशा वेळी ज्योतिष्याचा आधार घेऊ नये.

👉🏽तुमचा जन्म लोककल्याणास्तवच आहे. ज्यांनी असं खडतर व्रत स्वीकारलेलं असतं, त्यांना यशच मिळतं!

👉🏽एक वेळ जावळी खोऱ्यातली झाडं त्या खानाला मोजता येतील. पण जावळी खोऱ्यातल्या झाडांच्या फांदी-सांदीतून, ढोल्या-झुडुपांतून, खाच-खळग्यांतून दबून बसलेली आमची माणसं त्याला हुडकता येणार नाहीत. खान भेटीला येईल, त्याच्याबरोबर फार तर बारा माणसं असतील आणि सभोवताली झाडीत आमचे सहाशे धारकरी तानाजी, येसाजीसह आमच्यावर लक्ष ठेवून आहेत.

👉🏽शिवाजीबरोबरच हे सारं संपणार असेल, तर आमच्या कार्याला अर्थ उरणार नाही. शिवाजी असो वा नसो, हे राज्य तडीस न्यायची जबाबदारी तुमचीच आहे. राज्य राखलंत, तर असे दहा शिवाजी निर्माण होतील.

👉🏽आपल्या भूमीत निधड्या छातीच्या वीरांना कमतरता नाही. हजारो नव्हे, तर लक्षवधी वीर उभे करता येतील. पण ते बळ उभं करणारा आणि योग्य कारणी बळाचा वापर करणारा द्रष्टा पुरुष क्वचितच जन्माला येत असतो. खानास मारल्याविना राज्य साधत नाही, हे जेवढं खरं, तेवढंच द्रष्ट्या पुरुषखेरीज राज्य उभं राहत नाही, हे सत्य आहे. राजे, तुम्हांला सुरक्षित राहालाच हवं!

👉🏽रेड्याची ताकद असावी. पण बुद्धी सिंहाची बाळगावी.

👉🏽यापेक्षाही मोठी संकटं आली, तरी आम्ही कचदिल होणार नाही; पण असले शब्द आम्हांला घायाळ करतात. आमच्याबरोबरच हा स्वराज्याचा खेळ संपणार असला, तर या खेळाला अर्थ काय? शेकडो लोकांच्या जीवांची गुंतवण केली, ती का एका माणसाच्या हौसेसाठी? नाही, मासाहेब! असला विचार कधीही मनात आणू नका. एक शिवाजी गेला, तर दहा शिवाजी निर्माण करण्याची जिद्द बाळगूनच तुम्हांला जगायला हवं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...